Hasan Mushrif ED Raids Live Updates : हसन मुश्रीफ यांना ईडीने बजावले समन्स, साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी बोलावले

Hasan Mushrif ED Raids Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Mar 2023 08:17 PM
ED Raids : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीने बजावले समन्स, साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी बोलावले

ED Raids : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी मुश्रीफ यांना चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलावले आहे. 

ED Raids : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसम मुश्रीफ यांना ईडीने बजावले समन्स, साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी बोलावले

ED Raids : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसम मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी मुश्रीफ यांना चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलावले आहे. 

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर ईडीची तिसऱ्यांदा छापेमारी; तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी 

Hasan Mushrif ED Raid : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी केली. आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून 4 वाजून 35 मिनिटांनी बाहेर पडले. ईडीच्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे. आतापर्यंत झालेल्या छापेमारीत तिन्ही वेळची एकच टीम होती. मात्र, आजच्या टीममध्ये अधिक अधिकाऱ्यांची संख्या होती. 

हसन मुश्रीफांवर ईडीची तिसऱ्यांदा छापेमारी; तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी

हसन मुश्रीफांवर ईडीची तिसऱ्यांदा छापेमारी; तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी करून अधिकारी बाहेर पडले आहेत. 

Hasan Mushrif ED Raid : तब्बल आठ तासांपासून हसन मुश्रीफांवर ईडीची कारवाई सुरुच 

Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी गेल्या आठ तासांपासून सुरुच आहे. सकाळी सात वाजता ईडीचे पथक कागलमध्ये पोहोचले आहे. दरम्यान, छापेमारी सुरु असताना मुश्रीफ यांची दोन मुले घरी आहेत. मुश्रीफ अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. घरात लहान मुलं आणि मोठा मुलगा आजारी असतानाही ईडीकडून चौकशी होत असल्याचे मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

दुपारनंतरही हसन मुश्रीफांवर ईडीची छापेमारी सुरुच

आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी सुरु असलेली ईडीची छापेमारी अजूनही सुरुच आहे. दुसरीकडे, कार्यकर्ते अजूनही निवासस्थानासमोर ठाण मांडून बसले आहेत. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहून कागल पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

Hasan Mushrif : 'त्या' तोतऱ्याचा महाराष्ट्राला अभिमान; किरीट सोमय्यांचे हसन मुश्रीफांवर टीकास्त्र

हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधींछी लूट केली असून भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच. 40 हजार शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केलीत. शेतकऱ्यांकडून 10 हजार घेतलेत. ते शेतकरी कुठे आहेत? हसन मुश्रीफ कुटुंबाने मनी लॉन्ड्रिंग केली आहे. सेटलमेंटचे अर्ज का केले? आयकर खात्याच्या ऑर्डरविरोधात हायकोर्टात कोण गेले? चोरी केली ती पकडली गेली त्यामुळे आता सेटलमेंटची भाषा करावी लागली, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. 


 

हसन मुश्रीफांच्या पत्नी म्हणाल्या गोळ्या घाला, कार्यकर्त्याने डोकं फोडून घेतलं; ईडी कारवाईने कागलमध्ये तणाव

आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्याने कागलमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  मुश्रीफ यांच्या पत्नीने गोळ्या घाला अशी प्रतिक्रिया दिली. घरासमोर जमलेल्या एका कार्यकर्त्याने  आपलं डोकं आपटून फोडून घेतलं आहे. त्यामुळे कागलमध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

Hasan Mushrif : कागल पोलिसांचे वराती मागून घोडे, ईडीच्या छाप्यानंतर तासाभरानंतर पोलीस मुश्रीफ यांच्या निवासस्थानी

कागल पोलिसांचे वराती मागून घोडे असा प्रकार समोर आला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या छाप्यानंतर तब्बल तासाभरानी कागल पोलिस मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे कार्यकर्ते निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर धडकले

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफ यांच्यावर चार तासांपासून ईडीची छापेमारी सुरुच  

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तिसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटेपासून ईडीचे पथक पोहोचले आहे. गेल्या चार तासांपासून ईडी कारवाई सुरु असल्याने समर्थकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूरहूनही कार्यकर्ते कागलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी घरासमोर ठिय्या मांडला असून त्यांनी ईडीकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध केला. 

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांची मोठी गर्दी

दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणाऱ्या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत.

Hasan Mushrif : एकदाच आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका; आमदार हसन मुश्रीफांच्या पत्नीला भावना अनावर

दरम्यान, तिसऱ्यांदा ईडी कारवाईनंतर आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला भावना अनावर झाल्या. त्या म्हणाल्या की, किती यायचे या ठिकाणी? किती त्रास द्यायचा काही आहे की नाही? रोज उठून ते सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायच तरी काय, यांना सांगा आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा. यावेळी बोलताना भैया माने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे जे काही जमलेले लोक आहेत ते समर्थक नव्हे, तर ते कामासाठी आलेले लोक आहेत. हसन मुश्रीफ ट्विट करतात आणि ईडी कारवाई होते, ईडीची बातमी त्यांना कशी कळते? अशी विचारण्यात त्यांनी यावेळी केली. त्यांनी सांगितले की मुश्रीफ हे गोरगरिबांचे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत.  त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून 1200 जणांना काम दिलं आहे. दोन हजार जणांना अप्रत्यक्ष काम दिलं आहे. कागल तालुक्यामध्ये समृद्धी आणली आहे. 

Hasan Mushrif ED Raid : अनिल देशमुखांवरील छापेमारीचा रेकाॅर्ड मोडायचा असावा; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाईचे आश्चर्य नाही, अनिल देशमुखांच्या केसमध्ये ईडी, सीबीआयकडून वर्ल्ड रेकाॅर्ड  केला होता. 109 वेळा छापेमारी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी विक्रम केला होता तो मोडायचा असेल ही शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्यांदा घरी जात आहे, तर पहिल्या दोन कारवाईत काय झालं याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा कारवाई; जयंत पाटील काय म्हणाले?

ही कारवाई अत्यंत धक्कादायक आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत धाडी घर, कारखान्यावर धाडी घेतला. आयकरनेही धाडी घातल्या होत्या. त्यांच्यावर खोटे गुन्हेही दाखल केले होते. या कृतीवरून स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत्या. उच्च न्यायालयाने कालच कोणत्या प्रकारे ताशेरे ओढले आहेत ते लक्षात घेणं आवश्यक होतं. एकाच ठिकाणी धाडी टाकणे, त्रास देणं का तर विरोधात आहे म्हणून. गेल्या दोन वर्षांपासून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.  विरोधांमधील लोकांवर कारवाई होत आहे. सत्ताधाऱ्यांची चौकशी करत नाही. अर्जाची दखल घेतली जात नाही. 

Hasan Mushrif ED Raid : एकदा आम्हाला गोळ्या घालून जावा; ईडी कारवाईने हसन मुश्रीफ समर्थकांना भावना अनावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. आज सकाळी कागलमधील त्यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे. त्यांच्या निवासस्थानी छापेमारी सुरू केली आहे. आज हसन मुश्रीफल कागलमध्ये येणार हे माहीत असल्याने त्यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते त्यांच्या समस्या घेऊन निवासस्थानी जमा झाले होते. त्यांना ईडी कारवाई सुरु असल्याचे समजताच त्यांनी आपल्या भावना प्रकर्षाने व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ ईडीच्या रडारवर असल्याने कार्यकर्ते संतापले आहेत. 

पार्श्वभूमी

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलच्या (Kagal) निवासस्थानी ईडीचे (ED) अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत. माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. आता पुन्हा एकदा ईडीकडून कोल्हापूर येथील मुश्रीफांच्या घरावर छापेमारी सुरु आहे.


संताजी घोरपडे कारखान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं होतं. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. 


मुश्रीफांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी


दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणाऱ्या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहे. 


मुश्रीफ तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर


भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर गेल्या दोन महिन्यांपासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर 21 दिवसांनी ईडीने ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.