Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव ग्रामपंचायतीत सतेज पाटील राखली आहे. सरपंचपदी प्रियाका पाटील यांचा विजय झाला. त्यामुळे सतेज पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. 


दरम्यान, पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये महाडिक गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. पाचगावमध्ये महाडिक आणि पाटील गटात थेट स्पर्धा होती. पाचगावात सत्तांतर करण्याच्या इराद्याने महाडिक गटाकडून मोठी ताकद लावण्यात आली होती. विरोधात महाडिक गटाकडून गाडगीळ रिंगणात असल्याने सतेज पाटील गटामध्ये साशंकता होती. मात्र, सतेज पाटील गटाने एकहाती सत्ता मिळवत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पाचगाव कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात संवेदनशील गाव आहे. दुसरीकडे कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांमध्ये निवडणूक होत असल्याने उत्सुकता आहे. 


दरम्यान, गांधीनगरमध्ये सतेज पाटील गटाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या ठिकाणी महाडिक गटाच्या संदीप पाटोळे यांनी विजय मिळवला असून ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामंपचायत असलेल्या पुलाची शिरोलीत सतेज पाटील गटाला दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. शिरोलीत महाडिक गटाने 18 पैकी 17 जागा जिंकताना सत्ता खेचली आहे. 


करवीर तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचे सरपंच एक क्लिकवर



  • हिरवडे खालसात काँग्रेस शेकापचे नदीफ मुजावर विजयी

  • गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे विजयी

  • सावर्डे दुमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी

  • सडोली दुमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी 

  • कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी 

  •  चिंचवडे तर्फ कळेमध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी

  •  हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी

  •  सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील विजयी

  •  सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ विजयी

  • पाडळी बुद्रुकमध्ये स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड विजयी

  • परितेत काँग्रेसचे मनोज पाटील विजयी

  • दिंडनेर्लीत स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे विजयी

  • कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील विजयी

  • नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर हे विजयी

  •  सादळे मादळे स्थानिक आघाडीचे पंडित बिडकर विजयी  


इतर महत्वाच्या बातम्या