Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील सकाळी 11 वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटांना धक्क्यावर धक्के बसले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 11 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धक्कादायक निकालांची नोंद होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून महाडिक गटाने सत्ता खेचून आणली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 18 पैकी 17 जागांवर महाडिक गटाने एकतर्फी विजय मिळवत सरपंचपदही जिंकले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील गटाला तगडा झटका बसला आहे. 


कोल्हापूर दक्षिणमध्येही सतेज पाटलांना धक्का


पुलाची शिरोलीमधील हा धक्का असतानाच गांधीनगर ग्रामपंचायतमध्येही सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. या ठिकाणी महाडिक गटाचे संदीप पाटोळे हे सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्येही पाटील गटाला धक्का बसला आहे. गांधीनगर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. त्यामुळे महाडिक गटाकडून दोन ग्रामपंचायतींमध्ये सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे. 


कागल तालुक्यामध्ये मुश्रीफांना राजेंचा दे धक्का 


कागल तालुक्यामध्ये यांना समरजितसिंह घाटगे गटाने चांगलाच हादरा दिला आहे. तालुक्यातील बामणी, कसबा सांगाव, निढोरी, रणदिवेवाडीत घाटगे गटाने सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे शिरोळ तालुक्यामध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित करताना चार ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. धैर्यशील माने यांच्या रुकडीमध्ये माने गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार राज्यश्री रुकडीकर विजयी झाल्या आहेत. मात्र, धैर्यशील माने यांच्या चुलत भावाला पराभव पत्करावा लागला आहे.


शिरोळ तालुक्यात यड्रावकर गटाचा दबदबा कायम


शिरोळ तालुक्यामध्ये 17 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण निकाल पाहता राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखताना काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांशी युती करत 17 पैकी 10 ठिकाणी सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले आहे. बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही गावांमध्ये यड्रावकर गटाला घेरण्याचा प्रयत्न झाला, पण यड्रावकर गटाच्या समर्थकानी चिवट झुंज देत विजय खेचून आणला आहे. यड्रावकर गटासाठी ग्रामपंचायतीच्या या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. 


इतर महत्वाच्या बातम्या