Gokul Mil Hike : गोकुळकडून (Gokul Milk Hike) दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्याने ग्राहकांना तगडा झटका बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळने (Gokul Milk Hike) दुधाचे दर वाढवले आहेत. राजधानी मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर गायीच्या दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत म्हशीच्या दुधाचा दर आधी प्रतिलिटर 69 रुपये होता तो आता 72 रुपयांवर पोहोचणार आहे, तर गायीच्या दुधाचा दर 54 वरून 56 रुपयांवर प्रति लिटर पोहोचणार आहे. उद्यापासून (10 फेब्रुवारी) नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे. 


कोल्हापुरात दोन रुपयांची वाढ 


कोल्हापुरात म्हशीच्या दुधाचा एक लिटरचा दर 64 रुपयांवरून 66 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. गायीचे दूध प्रति लिटर 48 रुपयावरून 50 रुपये इतके करण्यात आले आहे. पुण्यामध्ये म्हशीच्या दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्हशीचे एक लिटर दुधाचा 70 रुपयावरून 72 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. गायीचे दूध प्रति लिटर 56 रुपयांना मिळणार आहे.  


अमूलकडूनही दूध दरात अचानक वाढ 


केंद्रीय अर्थसंकल्पानंतर लगेचच अमूलनेही (Amul) दुधाच्या दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ केल्याचं निवेदन अमूलने जारी केलं आहे. दुधाचे वाढलेले दर 3 फेब्रुवारीपासूनच लागू झाले आहेत. अमूलचे ताजाचं अर्धा लिटर दूध 27 रुपयांना मिळणार आहे, तर 1 लिटर पॅकेटसाठी 54 रुपये मोजावे लागतील. अमूल गोल्ड अर्थात फुल क्रीम दुधाचे अर्धा किलोचे पॅकेट आता 33 रुपयांना मिळणार आहे. तर 1 लिटरसाठी 66 रुपये मोजावे लागतील. अमूल गायीच्या एक लिटर दुधाचा दर 56 रुपयांवर पोहोचला आहे. अर्ध्या लिटरसाठी 28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीचे A2 दूध आता 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.


कात्रज दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ 


दुसरीकडे पुण्यातील कात्रजचं दूध (Katraj Milk) दोन रुपयांनी महागलं आहे. कात्रज दूध संघाकडूनही गाय आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दरवाढ उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर म्हशीच्या दूध विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दरवाढीचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. ग्राहकांना प्रति लिटर दूधामागे आता दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या