Kolhapur Crime : लग्नापूर्वी फेसबुकवरुन ओळख झालेल्या तरुणाने विवाहित तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियात (Social Media)व्हायरल केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur) घडली. त्या तरुणाने संबंधित पीडित विवाहित तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे फेक इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन फोटो व्हायरल केले आहेत. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात (Chandgad Taluka) हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून समाधान खांडेकर (रा. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे.  


विवाहित तरुणीचे लग्नापूर्वीचे अश्लील फोटो सोशल मीडियात अपलोड करुन बदनामी केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपी आणि संबंधित विवाहित तरुणीची लग्नापूर्वी 2016 मध्ये फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर मैत्री झाली होती. त्यावेळी त्यांनी एका लॉजवरील अश्लील छायाचित्र चार दिवसांपूर्वी बोगस इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केली होती. त्याने हे अकाउंट हे त्यांनी संबंधित महिलेच्या मैत्रिणीच्या नावाने काढले होते. या अकाऊंटवर फोटो टाकल्यानंतर त्याला विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत धमकावण्याचाही प्रकार केला. त्यानंतर संबंधित विवाहित तरुणीने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. 


लग्नास नकार दिल्याने महिला पोस्ट मास्तरचा चारित्र्यहननचा प्रयत्न!


दरम्यान, यापूर्वी चंदगड तालुक्यामधील (Chandgad Taluka) महिला पोस्ट मास्तरने लग्नास नकार दिल्यानंतर रत्नागिरीच्या (Ratnagiri) चिपळूण (Chiplun) तालुक्यातील सहाय्यक पोस्ट मास्तरने चारित्र्यहनन करण्याचा प्रकार घडला होता. सहाय्यक पोस्ट मास्तरने संबंधित महिलाच्या कार्यालयात जाऊन चारित्र्यहननचा प्रयत्न केला होता. संशयित डाक सहाय्यक शिरगाव (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील होता. त्याने पीडित महिला पोस्टमास्तरकडे लग्न झालं आहे की नाही? याची चौकशी केली होती. यानंतर डाक सहाय्यकाने तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असल्याचे म्हणाला. डाक सहाय्यकाला महिला पोस्टमास्तरने समजावून सांगत त्याला नकार दिला होता. 


त्यानंतरही संशयिताने मोबाईलवरुन फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने, तुझे लग्न कसे ठरते ते बघतो, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडिताने नंबर ब्लॉक केला. इतक्यावरही त्याने न थांबता संशयिताने पीडितेच्या संबंधितांचे नंबर मिळवून त्यांच्याकडे चारित्र्यहनन होईल, असे संभाषण केले. याची माहिती गावातील पोस्टमनने त्या पीडिताला दिल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली.


इतर महत्वाच्या बातम्या