Kolhapur Crime : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यातील वारुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत टँकर चालक 50 टक्क्यांहून अधिक भाजला (Kolhapur Crime) आहे. तरुणांनी धाडसाने त्याला केबिनमधून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला आहे. उपचारासाठी त्याला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर (Kolhapur Crime) वारुळजवळ गॅस टँकरला भीषण आग लागली. मार्गावरून वळणावर झाडाला टँकरची धडक बसल्यानंतर टँकरने पेट घेतला. त्यामुळे टँकर चालक गंभीर जखमी झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या घटनास्थळी गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली. आगीनंतर केबीनमध्ये अडकलेल्या चालकास स्थानिक तरूणांनी धाडसाने वाचवले. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जयगडहून गॅस भरून हा टँकर आला होता. वारुळजवळ चालकाचे नियंत्रण सुडल्याने टँकर वळणावर असणाऱ्या झाडाला धडकला. 


या धडकेनंतर टँकरच्या केबीनला आग लागली. गॅस टँकर असल्याने स्फोट होईल, अशी भीती त्याठिकाणी पसरली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने कोणतीही अनर्थ घडला नाही.  (Kolhapur Crime)


इतर महत्वाच्या बातम्या