Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (NCP Mla Hasan Mushrif) यांच्यावर झालेल्या कथित आरोपांचं कोलकाता कनेक्शन एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ईडीच्या (ED) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 15 वर्षांआधी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या (Sugar Factory) खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील (Kolkata) काही शेल कंपन्यांचा वापर करून काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीनं केला आहे.
मुश्रीफ यांच्यावर नेमका आरोप काय?
ही ईडीची केस आहे. या प्रकरणाची मागील सहा महिन्यांपासून आम्ही चौकशी करत होतो अशी माहिती ईडीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून एबीपी माझाला मिळाली आहे. काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत. जवळपास 15 वर्षापूर्वी या कंपन्या बंद पडल्या होत्या. या कंपन्यांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 50 कोटी रुपयांची रक्कम भरल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. ही रक्कम साखर कारखान्यामध्ये गुंतवल्याची माहिती मिळत आहे.
सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, माझ्या कामाची माहिती घ्यावी
दरम्यान, आज सकाळी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. मी ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना पुन्हा डिवचण्यात कोणताही रस नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. किरीट सोमय्या हे कोल्हापूरला येणार आहेत. यावेळी ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. याबाबतही मुश्रीफांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्यांनी कोल्हापुरात यावे. अंबाबाईचे दर्शन घ्यावं. तसेच त्यांनी माझ्या कामाची माहिती घ्यावी असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले. सोमय्या आल्यानंतर तिकडे कोणीही जाऊ नये असे आवाहन देखील सोमय्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं.
ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार
चौकशीच्या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांचा कोणताही दोष नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरुन ते इथे आले आहेत असे हसन मुश्रीफ म्हणाले. अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले हे तेच सांगू शकतील असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले. मी ईडी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही मुश्रीफांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या: