Kolhapur Municipal Corporation : हरीओम नगरकडे जाणाऱ्या वितरण नलिकेवर अचानक गळती लागल्याने दुरुस्तीसाठी तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या शनिवारी ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगरांमध्ये दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सुद्धा अपुरा व कमी दाबाने होईल. दरम्यान, शिंगणापूर अशुध्द उपसा केंद्राकडील 1100 मी.मी. मुख्य वितरण नलिकेवर गळती लागली आहे. ही गळती सोमवारी काढण्यात येणार आहे. त्यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागामध्ये सोमवारी होणारा दैनंदिन पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. त्यामुळे सलग चार दिवस कोल्हापुरात पाण्याचे संकट असणार आहे. (Four consecutive days of water crisis in Kolhapur)
ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, त्याप्रमाणे सी डी वॉर्डमधील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवारपेठ तालिम परिसर, सिध्दार्थनगर, दसरा चौक, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफीस, बिंदु चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, रविवार पेठ, उमा टॉकीज परिसर, गुजरी, देवलक्लब तसेच ई वॉर्ड मधील खानविलकर पेट्रोलपंप परिसर, शाहुपूरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी परिसरात होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सोमवारी सुद्धा काही भागात पाणी पुरवठा बंद
दरम्यान, शिंगणापूर अशुध्द उपसा केंद्राकडील 1100 मी.मी. मुख्य वितरण नलिकेवर गळती लागली आहे. ही गळती सोमवारी काढण्यात येणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागामध्ये सोमवारी होणारा दैनंदिन पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. या कालावधीत दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या उपलब्ध टँकरने पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.
यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग व शहरातंर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजे संभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, मंगळवार पेठ. ई वॉर्ड मधील राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली परिसर, मातंग वसाहत, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंन्शन, पाचबंगला, कोरगावकर, राजाराम रायफल, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडीयल सोसायटी, तोरणानगर, काशिद कॉलनी, माने कॉलनी, चानाक्यनगर, एसटी कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीनपार्क परिसर, गोळीबार मैदान, उलपे मळा, रमणमळा, केव्हीज पार्क, नागाळ पार्क, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, महाडिक वसाहत, लिशा हॉटेल, मार्केट यार्ड, कावळा नाका, स्टेशन रोड, शाहूपुरी 1 ली ते 4 थी गल्ली, व्यापार पेठ इत्यादी भागातील नागरिकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या