Jyotiba Temple : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या जमिनीची परस्पर विक्री (Sale of Shree Jyotiba Devasthan land) केल्याची माहिती समोर आली आहे. सातारा, गोवा व कर्नाटक राज्यात असणारी चारशे एकर जमिनीपैकी 200 ते 250 एकर जमिनीची परस्पर व्रिकी झाल्याचे समोर आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अशा जमिनीचा शोध घेऊन या जमिनी जोतिबा मंदिराच्या ताब्यात घेणार आहेत. तहसिलदारांना जमिनीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सात बारावरती श्री जोतिबा देवस्थान (Sale of Shree Jyotiba Devasthan land) असे नाव आहे, पण इतर हक्कात ज्यांची नावे लागली आहे, त्या लोकांनी काही जमिनी आपल्याजवळ ठेवल्या आहेत, तर बहुतांश जमिनी परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास येत आहे. जोतिबा मंदिराच्या नावावर चारशे एकर जमीन आहे. ही जमीन कर्नाटक, गोवा, कोकण, सातारा आदी ठिकाणी असून या सर्व ठिकाणांहून जोतिबा मंदिरासाठी प्रमाणात खंड येत असल्या, तरी कोणाच्या ताब्यात आहेत याची नोंद दिसत नाही.
ज्या ठिकाणी जमिनी आहेत त्या ठिकाणच्या सातबारा उताऱ्यावर जोतिबा मंदिराचे नाव आहे. खंडाच्या मोबदल्यात जमिनी कसायला घेतल्या अन् त्याच जमिनी इतरांना परस्पर विक्री केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये खंड देऊन ताब्यात असलेल्या जमिनीवर थेट मालकी करुन मनमानी कारभार केला आहे. इतर हक्कातील नावाचा आधार घेत इतरांनाही जमीन विक्री केली आहे. याशिवाय ज्यांनी जोतिबा देवस्थानची जमीन घेतली आहे, अनेक मार्गांनी ही जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत. हा जमिनी धनदांडग्यांनी डोळा ठेवून लाटल्या आहेत.
जोतिबासह 28 गावांसाठी स्वतंत्र प्राधिकरण
दरम्यान, जोतिबा मंदिरासह 28 गावांच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. प्राधिकरणाचा प्रस्ताव 25 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. प्राधिकरणासाठी आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी पाठपुरावा केला होता. जोतिबा मंदिरासह नजिकच्या परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यासंदर्भात विनय कोरे यांनी प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकातून आठ ते दहा लाख भाविक जोतिबा यात्रेला येतात.
इतर महत्वाच्या बातम्या