एक्स्प्लोर

Narsobawadi : मोसमात तिसऱ्यांदा नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा संपन्न; गुरुवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी

Dakshindwar ceremony at Narsobawadi : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला. दक्षिणद्वार सोहळा आज गुरुवारी झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Narsobawadi : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला. दक्षिणद्वार सोहळा आज गुरुवारी झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून झालेल्या दमदार पावसाने तसेच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मोसमात तिसऱ्यांदा दत्त मंदिर पाण्याखाली गेले. यापूर्वी 12 जुलै रोजी दक्षिणद्वार सोहळा झाला होता. 

दत्त मंदिरात पाणी आल्यानंतर आज पहाटे ५ वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दिवसभर दक्षिणद्वार सोहळा राहिल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी केली. दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुख्य मंदिरामध्ये पाणी आल्याने श्रींची मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी महाराज मंदिरात ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे  नृसिंहवाडी व औरवाड गावाला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय?

नरसोबावाडीत कृष्णा नदी उत्तरेकडून येत दक्षिणेकडे वाहत जाते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून मार्गस्थ होते. याचवेळी अनेक भाविक या पवित्र स्नानाचा लाभ घेतात त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. 

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

दरम्यान, कालपासून पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. आज सकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 28 फुट 10 इंच इतकी होती. जिल्ह्यातील गेल्या 24 तासात 22 बंधाऱ्यांवर पाणी उतरले असून आता एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 43.7 मिमी पाऊस झाला. 

24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये 

  • हातकणंगले-1.5 
  • शिरोळ -1 
  • पन्हाळा-5.6 
  • शाहूवाडी-17.7
  • राधानगरी-11.5 
  • गगनबावडा-43.7 
  • करवीर-4.5 
  • कागल-4.4  
  • गडहिंग्लज-5.2
  • भुदरगड- 15 
  • आजरा-14.8 
  • चंदगड-17.9 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर
गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी सावध हालचाली, ठराव धारकांनंतर आता निवडून आलेले संचालक सुद्धा सहलीवर,

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget