एक्स्प्लोर

MVA on Chandkrant Patil : चंद्रकांत पाटलांविरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करा; कोल्हापुरात महाविकास आघाडीची मागणी 

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाविकास आघाडीने  केली आहे. पाटील यांच्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला आहे.

MVA on Chandkrant Patil : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रासिटीचा (atrocity agianst chandrakant patil) गुन्हा दाखल करा, अशी मागणी कोल्हापुरात महाविकास आघाडीने केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले. निवदेनात म्हटले आहे की, डाॅ.  बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून याला चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करणे, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 

'शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल'

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Chandrakant Patil) यांनी शाईफेकीचा दुर्दैवी प्रकार घडायला नको होतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, दादांची ही सातवी ते आठवी माफी असेल, असा खोचक टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. हसन मुश्रीफ आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, शाईफेकीसारखा दुर्दैवी प्रकार घडायला नको होता, पण दादा सातत्याने अशी वक्तव्य करतात. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना मिळालेल्या जामीनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, जामीनाची बातमी ऐकून आम्ही आनंदीत झालो होतो, पण पुन्हा दहा दिवसाची स्थगिती दिली असेल, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ईडीने जामीन दिला, पण सीबीआयने विरोध केला. त्यांचं वय 75 आहे. त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागत आहे. न्यायालय याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. 

तर ठाकरे गटाचे खासदार निधी देतील

मुश्रीफ यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीचाही समाचार घेतला. अशा प्रकारचे वक्तव्य कधी केली जात नाहीत. ते मदत करणार नसतील तर ठाकरे गटाचे खासदार निधी देतील. अशा वक्तव्याने जनता चिडून उठेल आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभवच करेल असे ते म्हणाले. राणे यांनी आपल्या विचाराचा उमेदवार निवडून न दिल्यास निधी न देण्याची धमकी प्रचार करताना दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
Kolhapur Crime News: कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
Gokul : गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट, 90 दिवसात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट, 90 दिवसात निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

व्हिडीओ

Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
Embed widget