एक्स्प्लोर

Kolhapur Nagarpalika Election 2022 : अतिवृष्टीने महापुराची टांगती तलवार, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची निवडणूक पुढे ढकलणार?

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी सुद्धा अतिवृष्टीने महापुराची टांगती तलवार कायम आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने 6 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रमावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Nagarpalika Election 2022 : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी सुद्धा अतिवृष्टीने महापुराची टांगती तलवार कायम आहे. जुलैच्या सुरुवातीपासून शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने 6 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रमावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून पावसाळा पार पडल्यानंतर निवडणूक घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 नगरपालिकांचा समावेश आहे ज्या ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड आणि कुरूंदवाड या 6 नगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे.या नगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. 

जिल्ह्यात सध्या 6 नगरपालिका निवडणूक प्रक्रिया तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारयाद्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे पंचगंगा नदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीकडे जात आहे. ज्याठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत नाही त्या भागातील अधिकारी, कर्मचारी पूरप्रवण क्षेत्रात गुंतले आहेत. त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीच्या कामावर होणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक आणि निवडणूक पूर्वीचे कामकाज मान्सून कालावधी पूर्ण झाल्यानंतर घेतल्यास प्रशासन तसेच नागरिकांना सोयीचे होईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

असा आहे नगरपालिका निवडणूक कार्यक्रम 

6 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 22 ते 28 जुलै यादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 29 जुलैला अर्जांची छाननी होणार आहे. 4 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक आयोग चिन्हवाटप करणार आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान, तर १९ ऑगस्टली मतमोजणी होणार आहे. 4 ते 18 असा 14 दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी मिळेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
DY Patil Passes Away Marathi News: असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
असंख्य शिक्षणसंस्था, क्रिकेट स्टेडियम, हॉस्पिटल, साखर कारखाना, शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ. डी वाय पाटील यांची कारकीर्द!
D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Embed widget