एक्स्प्लोर

Kolhapur Crime : थकीत बिलासाठी वीज पुरवठा खंडित केल्याने वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अन् दमदाटी; इचलकरंजीत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महावितरणच्या इचलकरंजी ग्रामीण उपविभागातील चंदूर येथील चार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित केल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार इचलकरंजीत घडला.

Kolhapur Crime : महावितरणच्या इचलकरंजी (Ichalkaranji Crime) ग्रामीण उपविभागातील चंदूर येथील चार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित केल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार इचलकरंजीत घडला. या प्रकरणी नंदकुमार लोखंडे, आत्माराम लोखंडेसह तीन जणांविरूद्ध इचलकरंजी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी विभागात थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी महावितरणचे थकबाकी वसुली पथक उपविभागीय अभियंता सुनिल अकिवाटे, सहाय्यक अभियंता स्वप्निल कोळी व सहकारी कर्मचाऱ्यांसह चंदूरमध्ये थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी गेले होते.

चंदूर येथील जयश्री गोलगंडे (2 लाक 5 हजार 230 रुपये), शोभा लोखंडे (2 लाख 65 हजार 200 रुपये), गणपती कारंडे (28 हजार 420 रुपये), अमर कारंडे (93 हजार 360 रुपये) या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात आला. या ग्राहकांना नियमानुसार लेखी पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, वीजपुरवठा खंडित केल्यानंतर तो पूर्ववत केल्याशिवाय वीज खांबावरून उतरु देणार नाही, असा दम भरत नंदकुमार लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की केली. घटनास्थळावरून पोलिसांनी लोखंडे व सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. हा प्रकार मंगळवारी दुपारी दीड ते अडीचच्या सुमारास चंदूरच्या शाहूनगर गल्ली क्रमांक 1 मध्ये घडला.  

यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी, सहाय्यक पोलिस निरिक्षक भालचंद्र देशमुख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. चंदूर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता स्वप्निल कोळी यांच्या फिर्यादीनुसार नंदकुमार लोखंडे, आत्माराम लोखंडे, अर्जुन पाटील, प्रसाद मेटे, योगेश वाघमारे यांच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, धमकी व दमदाटी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget