एक्स्प्लोर

शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे

Eknath Shinde Jaysingpur Speech : विकासकामं करताना भेदभाव करु नका, जयसिंगपूरला निधी दिला आता कोल्हापूरलाही मोठा निधी द्या अशी मागणी खासदार छत्रपती शाहू महाराजांनी केली होती.

कोल्हापूर : विकासकामं करताना आपण कोणताही भेदभाव करत नाही, कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार छत्रपती शाहू महाराजांना दिला. जयसिंगपूरला जर दोन हजार कोटी रुपये देत असाल तर कोल्हापूरसाठीही त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे. विकासकामात भेदभाव करु नका असं खासदार शाहू महाराज म्हणाले होते. त्यावर एकनाथ शिंदेंनी आपण विकासकामात भेदभाव करत नसल्याचं सांगितलं. जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण (Jaysingpur Shivaji Maharaj Statue) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज उपस्थित होते.

Shahu Maharaj Speech : काय म्हणाले शाहू महाराज? 

खासदार शाहू महाराज म्हणाले की, "महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. आज जयसिंगपूरसाठी महत्वाचा दिवस आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांनी हे जयसिंगपूर शहर स्थापन केलं. जयसिंगपूर शहरात नेहमीच आदर्श शहर ठरलं आहे, ते कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने शहराच्या लौकिकात भर पडेल. जयसिंगपूरला दोन हजार कोटी निधी देणार असाल तर कोल्हापूरला त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे. विकासकामात कोणतंही राजकारण करू नये."

विकासकामांत भेदभाव करणार नाही

शाहू महाराजांच्या नंतर भाषणाला उभे राहिलेले एकनाथ शिंदे म्हणाले की, "शाहू महाराज, मी विकासासाठी या हाताने दिलेले पैसे त्या हाताला कळू देत नाही. महाविकास आघाडीने अडीच वर्षात कोल्हापूरसाठी अडीच कोटी रुपये दिले होते. मी अडीच वर्षात 400 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्याला दिले. मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही. मी विकासकामात भेदभाव करत नाही."

एकनाथ शिंदे म्हणाले की, "राजर्षी शाहू महाराज यांनी हे शहर बसवलं आहे. इथले रस्ते 90 अशांचा कोनात तयार केले आहेत. हे मॉडेल शहर बघायला आले पाहिजे, तुम्हाला निधी कमी पडणार नाही. मी मुख्यमंत्री असताना कोणताही भेदभाव न करता निधी दिला. 300 बेडचे मेंटल हॉस्पिटल तयार केलं आहे. पण यामध्ये जयसिंगपूरकरांना जावं लागू नये. आमच्याकडे ठाण्याला देखील मेंटल हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी कधी कधी बेड बुक करून ठेवावा लागतो."

शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूर नगरीत छत्रपतींचा पुतळा उभारला आहे. कितीही संकटं आली तरी धैर्याने, बुद्धीने संकटावर मात करता येते हे महाराजांनी दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री असताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं, भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्या पुतळ्याच्या तलवारीचे टोक पाकिस्तानच्या दिशेनं आहे. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही असा संदेश त्यातून दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे केवळ पुतळे नाहीत तर प्रेरणास्थान आहेत. 

राज्यातील गडकोट किल्ल्यांचे जतन व्हायला पाहिजे यासाठी सरकार काम करतंय. जयसिंगपूर इथं सर्व काही काम झालं आहे, आनंद दिघे यांच्या नावाने पॅव्हेलियन होत आहे. पण सगळ्यात मोठं काम आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून केलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

लाडक्या बहिणींनी दिलेला शब्द पूर्ण करणार

माझ्या लाडक्या बहिणींना सांगून ठेवतो. कुणी काहीही म्हटलं तरी ही योजना बंद होणार नाही. आम्ही दिलेला वचननामा पूर्ण करणार. आमची टीम आहे तीच आहे. आधी मी मुख्यमंत्री होतो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्या खुर्चीवर बसवलं आहे. ज्या वेगाने काम केलं त्यापेक्षा दुप्पट वेगाने काम करणार असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Gokul President Election 2026: गोकुळ दूध संघावर सत्ता स्थापनेच्या दिशेने महायुतीचे पहिलं पाऊल?; वटहुकूम काढला जाण्याची शक्यता, नेमकं काय काय घडतंय?
गोकुळ दूध संघावर सत्ता स्थापनेच्या दिशेने महायुतीचे पहिलं पाऊल?; वटहुकूम काढला जाण्याची शक्यता, नेमकं काय काय घडतंय?
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget