Vegetable Prices fall in Kolhapur : राज्यात कांद्याच्या आणि टोमॅटोच्या दराची झालेली वाताहत ताजी असतानाच कोल्हापुरातही (Vegetable prices fall in Kolhapur) परिस्थिती तीच झाली आहे. भाज्यांची आवक घटल्याने दरावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे कांदा मातीमोल किमतीने विकला जात असल्याने करायचं तरी काय, अशी परिस्थिती उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला टोमॅटो (Tomato) खपवण्यासाठी रणरणत्या उन्हात चार ते पाच तासांची वाट पाहण्याची वेळ आली आहे. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून अवघ्या 10 रुपयांवर दर येऊन ठेपला आहे. व्यापारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून (एपीएमसी) मालाची खरेदी करतात, जी सध्या संपूर्ण जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील शेजारील जिल्ह्यांमधून कृषी उत्पादनांनी भरलेली आहे. 


लाल मिरच्या महागल्या


किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव कडाडले असताना लाल मिरच्या मात्र महागल्या आहेत. उन्हाळा जसजसा वाढत जातो तसतसे गृहिणी कांदा-लसूण चटणी तयार करतात, त्यासाठी ते चांगल्या प्रतीच्या लाल मिरच्या विकत घेतात. सध्या स्थानिक मिरच्या बाजारात उपलब्ध नाहीत. देशी मिरचीचा दर 350 रुपये किलो आहे, तर बेडगीचा दर 550 रुपयांवर, लवंगीचा दर 200 रुपयांवर आहे. कोल्हापूर एपीएमसीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी एपीएमसीमध्ये आठ रुपये किलोने कांदा विकला जात होता. गेल्या वर्षी याच दिवशी कांद्याला सरासरी 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला होता. उच्च दर्जाचा कांदा 15 रुपये किलोने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात सरासरी 10 रुपये किलोने विकला जात आहे.


आवक घटल्याने भाव सुद्धा पडले


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये उन्हाचा तडाका चांगलाच वाढल्याने त्याचा परिणाम आता भाज्यांच्या दरांवरही झालेला दिसून येत आहे. उन्हाच्या तावामुळे शेतातून ज्या दिवशी भाजीपाला काढला जातो, त्यानंतर दोन दिवसांमध्ये त्याची विक्री झाली नाही तर त्या पालेभाज्या खराब होऊन जातात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्या न काढण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक घटली आहे. त्यामुळे भाव सुद्धा पडले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी पालेभाज्या जेमतेम प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून येते. 


दरम्यान कलिंगड, द्राक्षाची आवक जोरात


दरम्यान, ठराविक फळांचा हंगाम नुकताच सुरु झाला आहे. त्यामुळे फळ बाजारात कलिंगड आणि द्राक्षाची नव्याने आवक झाली आहे. घाऊक बाजारपेठेत सरासरी रोज सात ते 12 टन फळी येत होती, त्यामध्ये सध्या दुपटीने वाढ झाली आहे. काही द्राक्ष व्यापाऱ्यांनी थेट गावांमध्ये जाऊन द्राक्ष विकण्यास सुरुवात केली आहे. सरासरी 50 ते 90 रुपये किलो दराने द्राक्ष विकली जात आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या