कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते दिलीप पाटील (Dilip Patil) यांची आज (दि. 20) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत घालवली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पुणे (Pune) येथे हलवत असताना कराड जवळ त्यांचे निधन झाले. मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात न्यायालय लढाईत त्यांचा मोठा सहभाग होता. 

Continues below advertisement


कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते 


कोल्हापुरातील मराठा आरक्षण संदर्भात न्यायालयीन लढा देणारे दिलीप पाटील यांचे आज निधन झाले. गेले काही दिवसांपासून मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना  घरी सोडण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास त्यांची तब्येत  अचानक बिघडल्याने कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यानंतर तब्येत आणखीन खालावल्याने त्यांना  कृत्रिम श्वासात देण्यात आला. त्यानंतर पुणे येथे  उपचारासाठी नेत असताना  वाटेतच कराड येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठा समाजातील  मराठा आरक्षण चळवळीचे नुकसान झाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Gadchiroli Police : सॅल्यूट... हातातून गोळी आरपार गेली, तरीही 6 तास लढला; जिगरबाज कमांडो नक्षलवाद्यांशी नडला अन् जिंकला