कोल्हापूर : राज्यात गेल्या काही वर्षांपासून निधी हा शब्द प्रत्येकांच्या तोंडात बसला आहे. प्रत्येक आमदार खासदाराच्या तोंडामध्ये निधी हा शब्द असतो. आम्हाला कमी मिळाला, त्यांना जास्त मिळाला, आम्ही वंचित राहिलो अशी वाक्ये नेहमीच कानावर येत असतात. आता हेच वाक्य पुन्हा एकदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये ऐकण्यास मिळालं आहे.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारादरम्यान पाच कोटी रुपयांच्या निधीचे प्रलोभन दाखवलं आहे. त्यांच्या प्रचाराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून यावर प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. खासदार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यातून लीड देणाऱ्या तालुक्याला देणार 5 कोटी रुपयांचा अधिकचा निधी देणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
ते म्हणाले की, संजय मुंडे निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यात जातील पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्यात येईल.
इतर महत्वाच्या बातम्या