एक्स्प्लोर

Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचं रुपडं पालटणार; तब्बल साडे चार एकरातील विकास आराखडा आहे तरी कसा?

Ambabai Mandir : अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करत असताना साधारण 350 दुकाने आणि घरांना नोटीस पाठवली आहे. भूसंपादन करण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांनी सहकार्य दाखवलं आहे.

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा (Development Plan of Ambabai Mandir) अखेर सादर झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. तब्बल साडेचार एकरात अंबाबाई मंदिराचा विकास करण्यात येणार आहे.

अंबाबाई मंदिराच्या चारी बाजूने विकास केला जाणार (Development Plan of Ambabai Mandir) 

भाविकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूने विकास केला जाणार आहे. यामध्ये मंदिर परिसर असलेल्या बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, दक्षिण दरवाजा या साडेचार एकराच्या परिसरात आराखडा राबविण्यात येणार आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी साधारण एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. 

कसा असेल विकास आराखडा (Development Plan of Ambabai Mandir) 

  • बिनखांबी गणेश मंदिर ते महालक्ष्मी बँकेपर्यंत भुयारी मार्ग 
  • भुयारी मार्गाच्या पुढे दोन मजल्यांचा प्लाझा असेल 
  • याप्लाझा मध्ये दर्शन मंडप, ऍम्पी थिएटर, दुकाने, स्वच्छतागृह अशा सुविधा असतील
  • संकन प्लाझा याठिकाणी 4 हजार भाविक बसतील आणि 1 हजार भाविक उभा राहतील अशी व्यवस्था
  • भाविकांना बिनखांबी गणेश मंदिराजवळ सोडले जाईल तिथून भुयारी मार्गे संकन प्लाझामध्ये प्रवेश होईल
  • संकन प्लाझाच्या शेजारी 330 चारचाकी, 650 दुचाकी आणि 7 बसच्या पार्किंगची सोय आहे

सर्वांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवणार 

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करत असताना साधारण 350 दुकाने आणि घरांना नोटीस पाठवली आहे. भूसंपादन करण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांनी सहकार्य दाखवलं आहे. त्यामुळे संबंधितांचे समाधान झाल्यानंतरच भूसंपादनाचे काम सुरू केले जाईल अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

अंबाबाई मंदिराच्या विकासामुळे कोल्हापूरच्या वैभवामध्ये आणखी भर पडणार

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासामुळे कोल्हापूरच्या वैभवामध्ये आणखी भर पडणार आहे. कोल्हापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे आई अंबाबाईच्या मंदिराचा विकास तातडीने व्हावा अशी सर्वच कोल्हापूरकरांची इच्छा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? कोल्हापुरातून पहिलं आव्हान, खंडपीठात याचिका दाखल
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
Accident News: मैत्रिणी ओरडल्या, बाजुला करण्यासाठी धावल्या पण..., क्षणार्धात अंगावर रक्त पडलं अन् अनुष्काचा मृतदेह 30 फूट हवेत उडाला, कानातले इयरफोन ठरले जीवघेणे, हातकणंगलेतील घटना
मैत्रिणी ओरडल्या, बाजुला करण्यासाठी धावल्या पण..., क्षणार्धात अंगावर रक्त पडलं अन् अनुष्काचा मृतदेह 30 फूट हवेत उडाला, कानातले इयरफोन ठरले जीवघेणे, हातकणंगलेतील घटना

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Embed widget