Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बाचणी गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून सासऱ्याला विष घालून मारणाऱ्या सुनेचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने कागल पोलिसांनी अटक केली आहे. 


सून रूपाली दत्तात्रय जाधव (वय 34) हिच्याविरोधात अण्णाजी बापू जाधव (वय 72) यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी (सासू) शोभा जाधव यांनी कागल पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सून रूपाली जाधवने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन्यासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाकडून अर्ज फेटाळण्यात आल्याने कागल पोलिसांनी अटक केली. 


ही घटना 27 जुलै रोजी घटली होती. सासू-सासरा दीर व संशयित सून असे सर्वजण एकत्र जेवण करताना अण्णाजी यांना उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना  अण्णजी जाधव यांचा  11 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.


कुटुंबामध्ये संपत्तीचा वाद


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जाधव कुटुंबात संपत्तीच्या वाटणीतून वाद सुरु आहे. अण्णाजी जाधव यांच्या मुलींनाही संपत्तीमध्ये वाटणी हवी असल्याचे समजते. या वादातून सून रुपालीने सासऱ्याच्या जेवणात विष घातले. याबाबत सासू शोभा यांनी कागल पोलिसांकडे तक्रार दिली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या