एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस खराखुरा निष्कलंक माणूस, बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला; सीएम एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सीएम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. शिंदे यांनी अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने निर्माण झालेल्या चिंतेवरून दिलासा देण्याचा प्रय़त्न केला.

CM Eknath Shinde In Kolhapur: पोपटाचा जीव कशात असतो म्हणतात त्या पद्धतीने तुमचा जीव मुंबई महापालिकेत आहे. खरा युती धर्म पाळण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हा खराखुरा निष्कलंक माणूस आहे, 2019 साली कलंकितपणा तुम्ही केला, बाळासाहेबांच्या नावाला कलंक तुम्ही लावला, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने निर्माण झालेल्या चिंतेवरून दिलासा देण्याचा प्रय़त्न केला. तसेच ही युती वैचारिक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.  

त्यावेळी सांगितलं मुंबई महानगरपालिका शिवसेनेला देऊन टाका 

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी सांगितलं मुंबई महानगरपालिका शिवसेनेला देऊन टाका. मात्र, देवेंद्र फडणवीस कोठेही बोलले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळालं असतं आणि त्यावेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाला असता म्हणून पद घेणे टाळलं, हे सर्व माझ्यावर ओढवलेले प्रसंग आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. युती टिकावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दरवेळी दोन पावलं मागे घेतली 2019 साली मी देखील आमच्या नेत्यांना सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचे फोन घ्या, एकत्र बसून निर्णय घेता येईल.

शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही

जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. बेरजेच्या राजकारणासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मी शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.  मुख्यमंत्री म्हणाले की, आपली झालेली वैचारिक, भावनिक युती आहे, स्वार्थाची नाही. 2019 मध्ये बाळासाहेबांना विचारांना तिलांजली दिली आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. निधीचाही विषय होता. मग आम्ही निर्णय घेतला. आपलं  सरकार मजबुतीने काम करत आहे. पूर्वीपेक्षा वेगळी स्थिती आहे, शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कोणताही अन्याय होणार नाही, एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

राजकारणात बेरजेची समीकरणे असतात, अजितदादांनी विकासाची भावना ठेवून आले. देवेंद्र यांनी सांगितलं आमची युती इमोशनल आहे. आपल्या सरकारला केंद्राचं पाठबळ आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. आणखी दीड वर्षात काय  होईल ही भीती अस्लयाने विरोधक मोट बांधण्यांचा प्रयत्न केला, पण त्यांची बोट तुटली. सलग दोनवेळा देशात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं, पण विरोधक एकत्र येऊनही ते एकाचे नाव ठरवू शकत नाही, नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Embed widget