Anand Mahindra : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदाने देशात साजरा केला गेला. या मोहिमेतून केंद्र सरकारकडून घरोघरी तिरंगा मोहिमेतून सर्वसामान्यांना सुद्धा तिरंगा घरावर फडकवण्याची संधी मिळाली. सर्वजण स्वातंत्र्याच्या उत्सवात रंगून गेले. पीएम मोदींच्या आवाहनानुसार प्रत्येकाने आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावला. दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पाण्याच्या बॅरेलवर उभी असलेली वृद्ध महिला आपल्या घरावर तिरंगा लावताना दिसून येत आहे. वृद्धेचा तोल जाऊ नये म्हणून वृद्ध पतीने बॅरेलला धररल्याचे दिसून येते. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, जर तुम्ही विचार करत असाल की स्वातंत्र्यदिनी एवढा गदारोळ का होतो, तर या दोघांना विचारा. ते कोणत्याही व्याख्यानापेक्षा चांगले समजावून सांगतील. जय हिंद.
दरम्यान, या फोटोनंतर या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. मात्र, त्यांनी फोटो जो शेअर केला आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा आहे. सध्या त्यांचे वास्तव्य कोल्हापूर शहराला लागून असलेल्या उचगावमध्ये आहे. त्यांचाच फोटो आनंद महिंद्रा यांनी शेअर केला असून तो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
हिंदुराव दत्तू पाटील आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी पाटील हे वृद्ध दाम्पत्य आपल्या घरोघरी तिरंगा मोहिमेत अंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावताना टिपण्यात आला होता. हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्या फोटोमधील निरासगता पाहून ट्विट करत प्रतिक्रिया दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
- Kolhapur News : वयाच्या 64 व्या वर्षी कोल्हापूरचा वाघ 75 किमी पळतोय! स्वातंत्र्यदिनी रंकाळ्याभोवती 9 तास 9 मिनिटांत 17 फेऱ्या मारून 75 किमी धावण्याचा विक्रम
- Kolhapur : तब्बल अडीच दशकांपासून तिरंगा फडकवणाऱ्या दरेकर कुटुंबीयांच्या घरी जात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून वंदन
- Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफांनी दोन म्हशी घेतल्या आणि स्वत:च कागलच्या गैबी चौकात त्यांचे स्वागत केले!
- Kolhapur News : विधवा व गरीब कुटुंबांचा घरफाळा कोल्हापूर जिल्ह्यातील उपसरपंचाने स्वत:च्या खिशातून भरला!