Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी आसुर्लेत घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अनिता बाबासो जाधव असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिचा पती संशयित आरोपी बाबासो बळवंत जाधवला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान, पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार अनिताचा पती बाबासोला दारूचे व्यसन होता. त्यामुळे पत्नी पत्नीमध्ये सातत्याने वादातून खटके उडत होते. बाबासो कामधंदा काहीच करत नसल्याने वाद विकोपाला जात होते. यामधून सोमवारी दोघांमधील वाद अत्यंत विकोपाला गेला. 


या वादात बाबासोने घरातील दगडी वरवंटा उचलत पत्नी अनिताच्या डोक्यात घातला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा तेजसने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित बाबासोला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या