Kolhapur Warana River : पंचगंगा नदी विषारी गंगा झाल्याने मृत माशांचा खच पडत असताना आता वारणा नदीची त्यामध्ये भर पडली आहे. वारणा नदीतही प्रचंड प्रदूषण होत असून हजार मासे मृत्युमूखी पडले आहेत. नदीमध्ये मळीयुक्त पाणी सोडल्याचा परिणाम असून पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. त्यामुळे हजारो मासे मृत होऊन नदीकाठाला तरंगू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर होऊ लागला आहे. नदीतील माशांचा मृत्यू होऊन नदीकाठी येत असल्याने मासे गोळा करण्यासाठी माणसे गोळा होत आहेत. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भादोले व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. वारणा खोऱ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत असलेल्या वारणा नदी वात्रात रासायनिक पाणी सोडण्याचा वारंवार घटना घडत आहेत. त्यामुळे लाखो जलचर जीवास  मुकत आहेत.


दुसरीकडे, (Panchganga River Pollution) प्रदुषित पाणी मिसळत असल्याने गटारगंगा झालेल्या पंचगंगेत गेल्या आठवडाभरातून जलचरांचा तडफडून मृत्यू सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिनचा अंश कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगेच्या नदीपात्रात (Panchganga River Pollution) मृत माशांचा खच पडत असतानाच आता शिरोळ तालुक्यातही तीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रदुषणाचा स्तर किती महाभयंकर झाला आहे, याचा अंदाज येतो. 


नदी हिरवीगार झाल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी


नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन संपत चालल्याने शेकडो जलचरांचा (Panchganga River Pollution) तडफडून मृत्यू होत आहे. शिये-कसबा बावडा मार्गावर पंचगंगा नदी पुलाखाली पात्रात शेकडो माशांचा ऑक्सिजन न मिळाल्याने पाच दिवसांपूर्वी तडफडून मृत्यू झाला. नदी पात्रातील पाणी प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याने मासे मृत होत आहेत. नदी सुद्धा हिरवीगार पडल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यात शेकडो मासे पाण्यावर येत आहेत. नदीची गटारगंगा होत असतानाही कोणीही दखल घेतलेली नाही.  मृत मासे पाण्यावर तरंगण्याचा तसेच ऑक्सिजनसाठी (Panchganga River Pollutionमाशांनी पाण्यावर येण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने शेकडो मासे पाण्यावर अनेकजण पकडत होते. 


इतर महत्वाच्या बातम्या