Kolhapur Crime : इचलकरंजीत गोदाम लुटण्याचा प्रयत्न सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात यश आले. पोलिस आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी चोरलेले साहित्य आणि चोरीचे साहित्य नेण्यासाठी आणलेली मालवाहतूक गाडी त्याच ठिकाणी सोडून अंधारात पसार झाले. त्यामुळे टोळीचा चोरी करण्याचा प्रयत्न पाहता ही टोळी सराईत असल्याचे स्पष्ट दिसते. सुमारे आठ ते दहा जणांनी साहित्य टाकून पलायन केले.


स्क्रॅप गोदामातील लोखंड चोरून गाडीत भरले जात असताना पोलिसांची चाहुल लागताच साहित्य व चार चाकी वाहन तिथेच टाकून आठ ते दहा चोरटे फरार झाले. पोलिसांनी मालवाहू वाहनाची झडती घेतली असता वाहनाच्या सीटखाली नंबर प्लेट, स्क्रॅप गोदामातील सीसीटीव्ही डीव्हीआर आणि मोबाईल मिळून आला. ही घटना इचलकरंजी चंदूर मार्गावर असणाऱ्या ओढ्याजवळ घडली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस (Kolhapur Crime) ठाण्यात झाली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी जावेद खाने आपले स्क्रॅप गोदाम बंद करून आल्यानंतर गोदामात असणाऱ्या सुरक्षारक्षकाला मोठमोठ्याने आवाज येत असल्याचे लक्षात येताच गोदाम मालक खान यांना दिली.  दरम्यान या मार्गावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पेट्रोलिंग वाहन जात असताना पोलिसांना बोलावून घेण्यात आले.  


यावेळी गोदामाचा पत्रा उचकटून चोरी केल्याचे लक्षात आले. तसेच गाडीच्या चाकाचे ठसे दिसल्याने माग काढत पोलिस पुढे जात असतानाच अंधाराचा फायदा घेत आठ ते दहा जण प्रसार झाले. चोरट्यांनी गोदामातील चोरलेले लोखंडी साहित्य त्याठिकाणीच सोडून दिले. चोरीचा मुद्देमाल भरून येण्यासाठी आणलेले (एमएच-09-एफएल-5373) चार चाकी मालवाहतूक वाहन आढळले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. रविवारी रात्रीच्या सुमारास घोडके नगर भागातही चार बंद घरे फोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.  


दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील खोतवाडीतही बांधकाम खोलीचे गज कापून साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. दोन ग्रायंडर मशीन व कटर मशीन असा माल चोरून नेला. गेल्या काही दिवसांमध्ये इचलकरंजी परिसरामध्ये घरफोड्या करण्याचे सत्र चांगलेच वाढले आहे.  (Kolhapur Crime)


इतर महत्वाच्या बातम्या