Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर (Kolhapur News) शहरातील दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या तीन जीवघेण्या स्पीड ब्रेकरवर तब्बल वर्षभर सांगून झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेकडून पांढरे पट्टे मारण्यात आल्यानंतर अवघ्या 12 तासांत गायब झाले होते. यानंतर एबीपी माझाने महापालिकेच्या कारभारावरून दणका दिल्यानंतर अवघ्या 12 तासांमध्ये सातारहून मशिन आणून त्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा 'माझा'ची बातमी, इम्पॅक्टची हमी! याची प्रचिती समस्त कोल्हापूरकरांना आली आहे. एबीपी माझाने यापूर्वी कोल्हापुरातील नागरी समस्या, तसेच रस्त्यांच्या दुर्दशेवरून सातत्याने आवाज उठवत झोपी गेलेल्या महापालिकेला जागं करण्याचं काम केलं आहे. कोल्हापुरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर माझाने सातत्याने यासंदर्भात आवाज उठवला आहे.  


अनेकाचे गुडघे फुटल्यानंतर मनपा शहर अभियंत्यांना जाग आली 


कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून खानविलकर पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन स्पीडब्रेकर आहेत. मात्र, एकाही स्पीडब्रेकरवर ओळखून येण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी दररोज एक, तरी अपघात ठरलेला होता. शुक्रवारी पुन्हा एक अपघात झाला. यानंतर रात्री कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी धावत पांढरे पट्टे मारायला आले, पण रात्री मारलेले पट्टे शनिवारी सकाळी गायब झाले होते. त्यामुळे एबीपी माझाने वृत्त प्रकाशित केले होते. 


या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे मुख्य शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा विनंती करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून विनंती केल्यानंतर शुक्रवारी रात्री कामाला मुहूर्त मिळाला. मात्र, केलेलं काम दिवस सोडा, अवघे 12 तासही राहिलं नव्हते. नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा माध्यमातील प्रतिनिधींनी अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्यासाठी सातत्याने विनंती केली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली होती. 


कोल्हापूर शहरातील शासकीय कार्यालयात जात असताना याच मार्गावरून अनेकांना जावं लागतं. त्यामुळे हा मार्गखूप रहदारीचा आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला देखील या मार्गावरून वाहन चालवत असतात. मात्र, स्पीड ब्रेकर दिसून येत नसल्याने त्यांना गाडीवर ताबा मिळवणे अवघड होऊन सातत्याने अपघात घडत होते. 


महत्वाच्या इतर बातम्या :