कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी कसण्यासाठी दिलेली जमीन काढून घेतल्याचा आरोप कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील सिद्धनेर्ली गावातील ग्रामस्थांनी केलाा आहे. जमीन पूर्ववत नावावर न केल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली गावामध्ये काही ग्रामस्थांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जवळपास पाच एकर जमीन कसण्यासाठी दिली होती. मात्र, ही जमीन 100 वर्षांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. काल (1 ऑक्टोबर) सिद्धनेर्लीमधील संबंधित जमीन कसणाऱ्या ग्रामस्थांनी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.

Continues below advertisement






तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात 


यावेळी ग्रामस्थांनी समरजीत घाटगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कागल तहसील कार्यालयाच्या दारात निदर्शने केल्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन जमिनी पूर्ववत आमच्या नावावर कराव्यात अन्यथा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या