Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याकडून (Kolhapur Police) पोलिस ठाण्यातच महिला काॅन्स्टेबलकडे शरीरसुखाची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पोलिस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार (Kolhapur Crime) घडला आहे. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी (Kolhapur Police) उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. 


पीडित महिला कॉन्स्टेबलने पोलिस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेत पन्हाळा पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने पोलिस ठाण्यातच शरीरसुखाची मागणी केल्याची लेखी तक्रार केली आहे. पोलिस ठाण्यातील शरीरसुखाची मागणीला नकार दिल्यानंतर शारीरिक, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर पोलिस दलासह (Kolhapur Police) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


दरम्यान, उच्चस्तरीय समितीमध्ये अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांचा समावेश आहे.उच्चस्तरीय समितीकडून दोन्ही बाजूंनी चौकशी केली जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल, असेही पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे.   


अल्पवयीन मुलीव अत्याचार करण्याचा प्रयत्न


दरम्यान, इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji Crime) धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षात कोंबून अत्याचार करण्याचा (Sexual Assault) प्रयत्न केला होता. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आईला हा गंभीर प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पाच दिवसांनी ही घटना उघडकीस आली होती. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर एका नराधमावर गावभाग पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Kolhapur Crime : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कारचालकाला बेड्या


दुसरीकडे कोल्हापुरातून (Kolhapur Crime) पुण्याला जाणाऱ्या तरुणीचा खासगी कंपनीच्या कार चालकाने निनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तरुणीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित कारचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. कार भाड्याने घेऊन पुण्याला जाताना कारचालकाने तरुणीचा विनयभंग केला होता. तसेच तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवले. याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा (juna rajwada police station) पोलिसांनी कार चालक रोहित राजेंद्र कार्वेकर (वय 28, रा. दानोळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर) याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. 


इतर महत्वाच्या बातम्या