Kolhapur Ganesh 2022 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोल्हापूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तीन हजार पोलिसांसह 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिरवणूक मार्गांसह महत्त्वाच्या ठिकाणांवर असेल. मिरवणुकीत जाणीवपूर्वक अडथळा, वाद निर्माण करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या मंडळांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. तसेच या मंडळांना मिरवणुकीत लवकर प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. 


महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकेही तैनात करणार आहेत. मिरवणूक मार्गावर खबरदारीचा भाग म्हणून जनरेटर आणि रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गणेश मिरवणूक उत्साहात आणि शांततेत व्हावी, यासाठी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तसेच पोलिस मित्र व स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवकांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.


मिरवणूक मार्गांवर 200 सीसीटीव्ही 


विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिकसह दोन समांतर मार्गांवर 200 हून अधिक ठिकाणी सीसीटीव्‍ही असतील. सेफ सिटी अंतर्गत शहरात बसविलेल्या कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाईल. या कॅमेऱ्यांचे पोलिसांकडून नियंत्रण केले जाणार आहे.


होमगार्ड 1700 असतील 


मिरवणुकीमध्ये पोलिसांसह 1700 होमगार्डही असणार आहेत. 


मिरवणूक मार्गावर 30 टॉवर


मिरवणूक मार्गावर वॉच ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने 30  हून अधिक टॉवर उभे केले आहेत. येथून शस्‍त्रधारी पोलिस दुर्बिणमधून मिरवणुकीवर लक्ष ठेवतील. 


जनरेटरची सुविधा


मिरवणूक मार्गावर अनेकदा वीजपुरवठा खंडित करावा लागतो. यामुळे गोंधळ होण्याचे धोके वाढतात, पण यावर्षी महापालिका आणि पोलिस प्रशसानाकडून मिरवणुकीवर स्‍वत:ची जनरेटर व प्रकाश यंत्रणाही ठेवली जाणार आहे.


सहा रुग्‍णवाहिका


मिरवणुकीत जर कोणाला वैद्यकीय मदतीची गरज भासल्‍यास मुख्य चौक, गर्दीची सहा ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या