Ichalkaranji Ganesh 2022 : अनंत चतुर्दशी दिवशी इचलकंरजी शहरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी होत असते. गर्दीमुळे वाहनांची कोंडी होऊ नये, वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ते सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत.


वाहतुकीसाठी बंद व चालू केलेले मार्ग खालील प्रमाणे


सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन मुख्य मार्ग शाहू पुतळा-शिवतीर्थ जनता चौक-गांधी पुतळा-झेंडा चौक- मरगुबाई चौक ते नदीघाट येथील विसर्जन कुंड असा आहे.


सांगलीकडून येणाऱ्या वाहनांसाठी झेंडा चौक, गांधी पुतळा, जनता चौक, हवामहल बंगला, शिवाजी पुतळा मार्गे येणारी अवजड वाहनांची वाहतुकीसह एसटी बसेसला बंदी. ही वाहतुक सांगली नाका येथुन फॉरच्युन प्लाझा-लाल नगर- थोरात चौक-आंबेडकर पुतळा या मार्गाने एसटी स्टँड व शाहू पुतळ्याकडे येईल व सांगलीकडे जाणा-या अवजड वाहनांची वाहतुक व एसटी बसेसची वाहतुक त्याच मार्गाने होईल.


कुरुंदवाड, हुपरी, कागल, निपाणी व कर्नाटकातुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक पंचगंगा पुल येथुन इचलकंरजी शहरात येण्यास बंदी. त्यांना पर्यायी मार्ग पट्टणकोडोली-इंगळी, रुई पुल फाटा कबनूर मार्गे येतील व त्याच मार्गाने परत जातील. तसेच कुरुंदवाड, बोरगांव व कर्नाटकातून इचलकंरजीकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग अब्दुललाट-हेरवाड-कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडे वेस-महासत्ता चौक, थोरात चौक-आंबेडकर पुतळा मार्गे इचलकंरजी शहरात येतील व त्याच मार्गाने परत जातील.


शिवाजी पुतळा, जनता चौक, गांधी पुतळा, नारायण टॉकी, झेंडा चौक, फडणीस हौद, गुजरी पेठ चौक, मरगुबाई मंदिर चौक या गणपती विसर्जन मार्गास जोडणाऱ्या सर्व पोट रस्त्यावरुन येणाऱ्या सर्व वाहनांना मुख्य विसर्जन मार्गावर येण्यास व वाहन पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या