Khandwa Accident News : मध्यप्रदेशातील खंडवा शहरात दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 30 जण होरपळले असून पंधरा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या दुर्घटनेत जखमी रुग्णांवर सध्या खंडवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या रॅलीसाठी प्रशासनाकडून परवानगी घेऊन ही दहशतवाद विरोधी रॅली काढण्यात आली होती तरीही आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवत आयोजकांसह 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटने प्रकरणी 18 आयोजकांवर गुन्हे दाखल


खंडवा शहरात काल दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत अचानक मशालींचा भडका उडाल्याने रॅलीत सहभागी झालेले 30 जण होरपळले होते.  यात 15 जणांची प्रकृती गंभीर असून जिल्हा प्रशासनाने आयोजकांपैकी 18 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. काल खंडवा शहरात दहशतवाद विरोधी मशाल रॅली काढण्यात आली होती. या रॅली दरम्यान अचानक आग लागल्याने रॅलीत सहभागी झालेल्यांपैकी 30 जण होरपळले होते. त्यापैकी 15 गंभीर रुग्णांवर अद्यापही खंडवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जरी प्रशासनाकडून परवानगी घेऊन ही दहशतवाद विरोधी रॅली काढण्यात आली होती तरीही  आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवत 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


भरधाव कार दुभाजक तोडून दुसऱ्या कारवर आदळली, 7 जण गंभीर


वाशिम- रिसोड मार्गावर  मध्य रात्री सवड गावाजवळ एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. रिसोडकडून वाशिमकडे येणाऱ्या आणि वाशिम कडून रिसोड कडे जाणाऱ्या एका कारचा तोल जाऊन ती दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन धडकली. या विचित्र अपघात 7 जण जखमी झाले आहेत. यात दोन्ही कारचे मोठं नुकसान झाले असून सर्व जखमींना रात्रीच उपचारार्थ वाशिम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आले.


शिवशाही बस अपघातात महीला पोलीस कर्मचारीचा दुर्दैवी मृत्यू


गोंदियाच्या कोहमारा  गोंदिया मार्गावर डव्वा-खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एस.टी. बसच्या भिषण अपघातात ११ प्रवासी मृत झाल्याची घटना घडली. यामधे अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे. या अपघातात मृत्यु झालेली स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासु सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जिवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. आपल्या परिवारांना भेटुन स्मिता काल  (29 नोव्हेंबरला) आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला गेली आणि गोंदियाला जाण्यासाठी याच अपघातग्रस्त बस ने जात असता हा अपघात घडल्याने स्मिताचा जागीच मृत्यु झाला.



 

हेही वाचा: