Beed Crime : बीडच्या परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढली आहे. यानंतर या डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर परळीतील वातावरण तापले होते. तरुणीच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला.
डॉक्टरकडून तरुणीची छेड काढण्यात आल्यानंतर परळी बंदची हाक
अधिकची माहिती अशी की, परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढली. याच प्रकरणावरून पीडित तरुणीला न्याय मिळावा.. या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.. अखेर पोलिसांनी तपास करून डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर उद्या परळी बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांनी शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हस्तमैथून करून महिलांच्या वाळत घातलेल्या अंतरवस्त्रावर वीर्य टाकणाऱ्या विकृतास अटक, ठाण्यातील किळसवाणा प्रकार
हायप्रोफाइल सोसायटीतील एका इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात 20 वर्षीय विकृत तरुणाने पुरुष लैगिंक प्रक्रियेतील हस्तमैथुनाची क्रिया करून ते वीर्य सोसायटीतील महिलांच्या सुकत ठेवलेल्या अंतर वस्त्रावर टाकून स्त्री मनास लज्जा उत्पन्न केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आला आहे. ही घटना भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीच्या टेरेसवर घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात विकृतावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या विकृताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहंमद रेयान मोहंमद नफीज सिद्धीकी (वय 20)असे अटक केलेल्या विकृताचं नाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या