एक्स्प्लोर

Maharashtra Speaker | कालीदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी विधानसभा अध्यक्ष

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

मुंबई : विधानसभेचे सदस्य आणि वडाळ्याचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोळंबकर थोड्याच वेळात राजभवनात शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी कोळंबकर यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, दिलीप वळसे पाटील यांची नावं देखील चर्चेत होती.  निवडीनंतर उद्या कोळंबकर हे सर्व आमदारांना शपथ देणार आहेत. विधानसभा सचिवांकडे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन ज्येष्ठ सदस्यांची नावं आली होती. त्यापैकी ज्येष्ठ सदस्य म्हणून कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात आल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं. उद्या विधानसभा सत्र सुरू झाल्यावर सर्व पक्षीय नवनिर्वाचित आमदारांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं आहे. कोण आहेत कोळंबकर कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले. विधीमंडळ सचिवालयांच्या कार्यालयाने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी सहा ज्येष्ठ आमदारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाला पाठवली होती. या यादीमध्ये भाजपच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या एका आमदारांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या यादीत शिवसेनेच्या एकाही आमदाराचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विधीमंडळ सचिवालयाने पाठवलेल्या यादीतीन सहा आमदारांची नावं 1) राधाकृष्ण विखे पाटील - भाजप 2) कालिदास कोळंबकर - भाजप 3) बबनराव पाचपुते - भाजप 4) बाळासाहेब थोरात - काँग्रेस 5) के. सी. पाडवी - काँग्रेस 6) दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले. अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा पेच भाजपसमोर उभा राहिला आहे. "तुला माफ केलं आहे. तू परत ये. राजीनामा दे किंवा उद्याच्या बहुमत चाचणीपासून दूर राहा. जर असं केलं नाही आणि सभागृहात येऊन व्ही जारी केलास तरीही पक्षाकडे 'ऑप्शन बी' तयार आहे," अशी ताकीद शरद पवारांनी अजित पवारांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यानंतरच अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
बावनकुळे साहेब तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी केली तर तुम्हाला विदेशात पळून जावं लागेल, हर्षवर्धन सपकाळांचा खोचक टोला
Horoscope Today : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget