एक्स्प्लोर

Ambazari Lake : मित्राला वाचवण्यासाठी घेतली उडी, दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

विकेंडला मोठ्या संख्येत नागपुरकर फिरायला येतात. मात्र याठिकाणी सुरक्षेची उपाय योजना करण्यात आली नाही आहे. यापूर्वीही अंबाझरी येथे अशा घटना घडल्या आहेत. मात्र प्रशासन बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. 

नागपूरः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, या ठिकाणी पाण्यात पोहणे काहींच्या जीवावर बेतत आहे. रविवारी नागपुरात अंबाझरी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. नदी-तलावात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नदी, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

रविवारी नागपुरच्या अंबाझरी तलावात पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपुरातील चौघे जण फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांना तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर चौघांपैकी दोघांना पोहता येत नसल्याने ते बुडाले. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी बचाव पथक आणि पोलिसांनी तलावात बोट टाकत त्यांचा शोध घेतला. मात्र, काही वेळाने त्यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मिहिर शरद उके (वय 19, रा. इंदोरा) आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (20, रा. लष्करीबाग) अशी तलावात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

प्रशासन बघ्याच्या भूमिकेत

विकेंडला आणि सुट्ट्यांच्या दिवशी शहरातील अंबाझरी, फुटाळा परिसरात मोठ्या संख्येत नागपूरकर फिरायला येतात. मात्र याठिकाणी सुरक्षेची उपाय योजना प्रशासनातर्फे करण्यात आली नाही आहे. यापूर्वीही अंबाझरी आणि फुटाळा येथे आत्महत्या घडल्या आहे. दरवर्षी अशा घटना  घडत असताना प्रशासन बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. 

अवैध वसूलीही जोरात

मोठ्या संख्येत नागरिक याठिकाणी येत असल्याचे बघून परिसरातील काही भामट्यांकडून याठिकाणी अवैध पद्धतीने पे अॅन्ड पार्कच्या नावावर नागरिकांकडून पैसेही घेतात. तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात येते. मात्र या ठिकाणहून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनाही हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गर्दीने घेतली बघ्यांची भूमिका

मिहिर आणि चंद्रशेखर हे दोघेही बुडायला लागल्यामुळे काठावर असलेल्या दोघा मित्रांनी नागरिकांकडे ओरडून मदतीसाठी याचना केली. मात्र कोणीही मदतीसाठी धावून आला नाही तर दुसरीकडे अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास प्राधान्य दिले. रविवार असल्यामुळे तलावाच्या काठावर जवळपास असलेल्या 30 ते 40 जणांपैकी एकानेही मदतीसाठी धाव घेतली नाही. सगळ्यांनी बघ्यांची भूमिका घेतल्याने दोन तरुणांचा बळी गेला.

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Barve on CJP: 'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
'CJP आंदोलनाच्या आड राजकीय स्वार्थ..' सुनील बर्वेंच्या पोस्टवर ट्रोलिंग; VIDEO वर चाहत्यांचे सवाल
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
Embed widget