Chhagan Bhujbal : गेल्या दहा दिवसांपासून जालन्यातील वडीगोद्री येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे उपोषण सुरु होते. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज हाके आणि वाघमारे यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण करताना राजकीय आरक्षणाची मागणी केली आहे. 


छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही कुणालाही धमक्या देत नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यांना दुसरे ताट द्या, आमच्या ताटातले देऊ नका. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठींबा देतो. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावे, यासाठी आरक्षण आहे, असे त्यांनी म्हटले. 


...तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं


ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पाडले. पंकजाताईंनी समाजात तेढ नको म्हणून कोणाला विरोध केला नाही. तरीही काही लोकांनी त्यांना विरोध केला. सगळ्यांनी मिळून त्यांच्या पराभवाचे कारस्थान रचले. आम्ही लोकसभेवर जायचे नाही, विधानसभेवर जायचे नाही. जर असेच सुरु राहिले तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल. लढाई अजून संपलेली नाही. तर ती सुरु झाली आहे.  त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही. आपल्या हक्कांसाठी वणवा पेटवावा लागेल, असे त्यांनी म्हटले.


छगन भुजबळांची शेरोशायरी अन् कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी


दरम्यान, "शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नहीं, असे भुजबळांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा दिल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जातनिहाय जनगणनेला पाठींबा असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jalna : राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन 


औकातीत राहा बेट्या हो...मनोज जरांगेंवर छगन भुजबळ कडाडले, पंकजा मुंडेंच्या पराभवाचाही उल्लेख