Raksha Khadse जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपकडून (BJP) रक्षा खडसे (Raksha Khadse) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून (NCP Sharad Pawar) उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वैमनस्य आहे. चंद्रकांत पाटील यांनी अनेक वेळा रक्षा खडसेंना आमची गरज नसेल तर समजून घ्यावे लागेल, असा इशारा दिला होता. यामुळे रक्षा खडसेंना आपल्या मतदारसंघात महायुतीतूनच आव्हान निर्माण झाले होते.  


रक्षा खडसे चंद्रकांत पाटलांच्या भेटीला 


या पार्श्वभूमीवर आज रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना अडचणीची ठरू शकते. हे लक्षात आल्यावर अगोदर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आ चंद्रकांत पाटील यांच्या घरी जाऊन तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला होता. 


रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरणार?


यानंतर आता थेट रक्षा खडसे आमदार चंद्रकांत पाटलांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मोदी यांना तिसऱ्यावेळी पंत प्रधान करण्यासाठी आपण काम करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. आता रक्षा खडसेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील आणि खडसे कुटुंबियांचा तिढा सुटणार का? रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


एकनाथ खडसेंकडून सुनबाईसाठी प्रचार


एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा अजून भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. त्यांचा प्रवेश झाला नसला तरी एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात सावदा आणि फैजपूर परिसरात बैठका घेतल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबर रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु असल्याचे दिसून येत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Raver Lok Sabha : रक्षा खडसेंनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावललं, मतदानावेळी 'नोटा'च करा, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन