Raver Lok Sabha Election 2024 : प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे महायुतीत सहभागी आहेत. असे असतानाही  रावेर लोकसभा मतदारसंघाच्या (Raver Lok Sabha Constituency) उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) या आपल्या प्रचारात केवळ बच्चू कडू यांचा फोटो वापरतात, मात्र रावेर मतदारसंघातील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत जातंय. असा आरोप प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसेच आज मलकापूर (Malkapur) येथे पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करण्याच आवाहनही प्रहारच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत महायुती मधील हा वाद रावेर मतदारसंघात उफाळून आला आहे. 


'नोटा' च दाबण्याचा प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन


उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे, रावेर मतदारसंघ (Raver Constituency) होय. या मतदारसंघात (Raver Lok Sabha Constituency) भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे त्यांचा सामना आता महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांच्याशी होणार आहे. असे असताना महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहार आणि भाजप मधील वाद समोर आला आहे. रावेर मतदारसंघात प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रक्षा खडसे डावलत असल्याचा आरोप प्रहारकडून करण्यात आला आहे.


तसेच एक पत्र प्रसिद्ध करत रक्षा खडसेंना मतदान न करता सर्वात शेवटचं नोटांच बटन दाबण्याचेही आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केल आहे. यामुळे मात्र आता रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्या चित्र आहे. परिणामी याचा फटका उमेदवार रक्षा खडसे यांना बसतोय का? की हा वाद शमवण्यासाठी उच्च पातळीवर काही घडामोडी घडतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


रक्षा खडसेंच्या विजयासाठी एकनाथ खडसे मैदानात 


जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात विविध भागत प्रचाराचा धुराळा लावला आहे.  त्यासाठी रावेरच्या अनेक भागात बैठका घेतल्या जात आहेत. सोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या प्रयत्नासह रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या