Ganesh Chaturthi 2022 : कोरोना (Covid-19) काळानंतर तब्बल दोन वर्षांनी देशभरात सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2022) रंगत सगळीकडे वाढली असताना जळगावतही हा उत्साह अधिक वाढताना दिसतोय. या उत्साहात आता महिलांचाही उत्साह प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय. जळगावात माहेर गृप आणि कट्टा सुगरण गृपच्या वतीने महिलांसाठी मोदक (Modak) बनविण्याची स्पर्धा पार पडली. याठिकाणी तब्बल 40 वेगवेगळ्या प्रकारचे मोदक महिलांनी बनविल्याचे पाहायला मिळाले. 


माहेर गृप आणि कट्टा सुगरण गृप तसेच नगरसेविका सुरेखा तायडे यांच्या वतीने महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यंदा गणेशोत्सवात महिलांना आनंद मिळावा, त्यांच्यासाठी मोदक बनविणे, थाळी सजविणे, तसेच विविध पद्धतीने खेळ घेण्यात आले. मोदक बनविण्याच्या स्पर्धेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल 40 हून अधिक महिलांनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. उकडीचे मोदक, खोबऱ्याचे मोदक, चॉकलेटचे मोदक, विड्याच्या पानापासून बनविलेले मोदक, डाळीचे मोदक, पेढ्यांचे मोदक, मोतीचूरचे मोदक असे वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट मोदक या ठिकाणी पहायला मिळाले. कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपायुक्त डॉ. विद्या गायकवाड, नगरसेविका गायत्री राणे, नगरसेविका सुरेखा तायडे तसेच सखी सुगरण ग्रुपच्या शिला चौधरी या सुध्दा या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांना मोदक टेस्ट करण्याचा मोह आवरला नाही, त्यांनीही या ठिकाणच्या विविध मोदकचा आस्वाद घेतला.


महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला


या संदर्भात नगरसेविका सुरेखा तायडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या, मोदक बनविण्याच्या स्पर्धेत सर्वच मोदक उत्कृष्ट आणि चविस्ट असल्याने विजेत्यांची निवड करतांना परिक्षकांचीही मोठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. वेगवेगळ्या स्पर्धा या होत असतात. महिलांसाठी मोदक बनविण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना मोठा आनंद झाल्याचे पाहायला मिळाले. या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुण सादर करण्याची संधी मिळाल्याने स्पर्धेत सहभागी महिलांनी कट्टा सुगरण गृपचे आभार मानले. 


साधना महाजन म्हणाल्या...


तर मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन म्हणाल्या, या स्पर्धांमुळे अनेक दिवसांनंतर महिला एकत्र जमल्या. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळाले. जिंकण्यापेक्षा स्पर्धेत सहभागी झाल्याचाच मोठा आनंद महिलांना झाल्याचे पाहायला मिळाले. 


महत्वाच्या बातम्या :