Gulabrao Patil On Aditya Thackeray: जळगावातील कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या अनोख्या शैलीत आज भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच संजय राऊत यांच्यावर भाषणातून निशाणा साधला आहे. यावल तालुक्यातील नावे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा अनावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. 


शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होते आहे. म्हणते गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले, ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही.. जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतोय. मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात गेलेले आमदारांवर टीका करणारे आदित्य ठाकरे यांचा जोरदार शब्दात समाचार घेतला आहे. 


तूम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकतात. मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. बाळासाहेबांचा विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे, असे म्हणत  गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेची तोफ डागली. कोण आदित्य ठाकरे असं म्हणत यांना काय अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा, असं ही यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


'लोक आम्हाला म्हणतात, तेरा क्या होगा कालिया'


संजय राऊत यांच्यावर टीका करत ते म्हणाले की. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांच्याकडून उडाले ते कावळे राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. राऊत यांना आवरा असं म्हणत चहा पेक्षा किटली गरम अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. ते म्हणाले, 35 वर्ष एकच झेंडा, एकच विचार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणारे आम्ही आणि आमच्या टीका करतात. या टीका करणाऱ्यांची लाज वाटते, असेही मंत्री पाटील म्हणाले. कोण संजय राऊत असं म्हणत आमदाराने मत दिली म्हणून ते खासदार झाले.


'ज्याप्रमाणे अली बाबा चाळीस चोर होते, तसं तस आम्ही शिंदे बाबाके चाळीस'


ते म्हणाले, मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी मुलांचे फोन आले की, परत या म्हटलं. आता परत येत नाही, असं म्हणत ही संघर्षाची कहाणी असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.  ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे अली बाबा चाळीस चोर होते, तसं तस आम्ही शिंदे बाबाके चाळीस, या शब्दात इतिहास लिहिला जाईल. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.