Jalgaon Bribe News जळगाव : वीज चोरी प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल एक लाखांची लाच (Bribe) घेताना कंत्राटी वीज वायरमनला (Contractual Wireman) जळगाव एसीबीने (Jalgaon ACB) सापळा रचत रंगेहाथ अटक केली. यामुळे वीज कंपनीच्या वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशांत विकास जगताप (33) (Prashant vikas Jagtap) असे वायरमनचे नाव आहे.


जळगावातील (Jalgaon Bribe News) एका भागातील 53 वर्षीय तक्रारदाराने घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले आहे. त्यांनी घराला वीज मीटर (Electricity meter) बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला असला तरी त्यांना मीटर देण्यात आले नव्हते. मात्र, त्यांनी खांबावरून वीज प्रवाह घेतल्याने वीज कंपनीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. 


एक लाख साठ हजारांची मागितली लाच


चार लाख 60 हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल, असा निरोप कंत्राटी वायरमन यांच्यामार्फत देण्यात आल्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली. एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवण्याचे आश्वासन देत लाच (bribe) मागण्यात आली. 


वायरमनला पकडले रंगेहाथ


एक लाख 40 हजार रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाचेतील पहिल्या टप्यात मंगळवारी रात्री दहा वाजता एक लाखांची लाच देण्याचे ठरले. कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप यांना जळगावच्या (Jalgaon) टॉवर चौकात एक लाखांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. 


लाचखोरीत राज्यात नाशिक अव्वल


दरम्यान, 2023 साली महाराष्ट्रात (Maharashtra News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल 803 गुन्हे नोंदवत 1 हजार 170 आरोपींना ताब्यात घेतले आहे. 803 गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिक विभागात (Nashik Division) दाखल झाले आहेत. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Sharmistha Gharge-Walawalkar) यांच्या दमदार कामगिरीने नाशकात तब्बल 163 लाचखोरीचे (Bribe) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1 ठरला आहे.  नाशिक पाठोपाठ पुणे (Pune) विभागात १५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) १२५ गुन्हे दाखल झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Crime News : शिवीगाळ अन् गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रकार; संशयितांच्या काही तासांतच आवळल्या मुसक्या


Girish Mahajan : निकाल येण्याआधीच न्यायालयावर टीका करणं चुकीचं; गिरीश महाजन उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बरसले