Nashik Crime News नाशिक : देवळाली (Deolali) गावात काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड (Vehicle Vandalism) करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मागील भांडणाची कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशाने संशयितांनी परिसरात दहशत माजविली होती. याबाबात उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात (Five Suspects Arrested) घेतले आहे.


आतिश सोन्याबापू जंगम यांचे कुटुंबीय झोपलेले असताना पाच जण मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता परिसरात राहणारे गुरुज भालेराव, अश्रफ मणियार, साहिल नायर तसेच त्यांच्या सोबत असलेले इतर तीन ते चार लोक हातात कोयते, तलवार व लोखंडी रॉड घेऊन आबा पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून शिवीगाळ केला. 


गाड्यांच्या काचा फोडल्या


त्यानंतर आबा पवार यांच्या घरात प्रवेश करून आतील सामानाची तोडफोड केली. संशयितांनी घरासमोर पार्क केलेली वाघोली यांची पिक-अप, तसेच किशोर सिसोदे यांची (एमएच 15, बीएक्स 1019) वरना, अ‍ॅक्टिव्हा मोपेड (एमएच 15, जेजे 6124), अ‍ॅपेरिक्षा (एमएच 15, जेए 0156), अ‍ॅक्टिव्हा मोपेड (एमएच 15, एफएल 4645), अ‍ॅक्टिव्हा मोपेड (एमएच 15, सीआर 7559), बजाज बॉक्सर (एमएच 15, एआर 0377), स्पार्क मोटारकार (एमएच 03, एआर 8873), मोपेड (एमएच 15, जीझेड 9061), ज्युपिटर मोटारसायकल (एमएच 15, जेएन 8059) यांच्यासह आणखी काही गाड्यांचे नुकसान संशयितांनी केले आहे. 


पोलिसांची घटनास्थळी भेट


या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) संशयित आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे (Vijay pagare) यांनी व पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monika Raut) यांनी घटनास्थळी भेट दिली. 


पाच जण ताब्यात


उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलीस शिपाई जयेश शिंदे, सतीश मढवई यांच्या मदतीने अजिम मुजम्मिल शेख, फरहान जमीर खान व साहिर निसार नायर या तीन मुख्य संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी काही तासांत ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Girish Mahajan : निकाल येण्याआधीच न्यायालयावर टीका करणं चुकीचं; गिरीश महाजन उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर बरसले


Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर हाजीर हो! न्यायालयाचे आदेश, महापालिकेच्या कंत्राटात अपहार केल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा