Jalgaon News Updates: जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. याबाबत सहकार विभागाने आदेशही पारित झाले होते. मात्र आता पुन्हा ही निवडणूक ठरल्या तारखेलाच घेण्याचे नवीन आदेश सहकार विभागाने काढले आहेत. त्यामुळे आता पूर्वीच्या आदेशानुसार 10 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान तर 11 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  दरम्यान जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीबाबत दोनच दिवसात पुन्हा नव्याने आदेश निघाल्याने चर्चेला उधाण आले असून आता पुन्हा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा चांगलाच धुराळा उडणार आहे.


जळगाव  जिल्हा दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. याबाबत सहकार विभागाने आदेशही पारित झाले होते. मात्र आता पुन्हा ही निवडणूक ठरल्या तारखेवरच घेण्याचे नवीन आदेश सहकार विभागाने काढले आहेत. त्यामुळे जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत पुन्हा मोठा ट्वीस्ट निर्माण झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. 


जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तसेच माघारीसह उमेदवारांना चिन्ह वाटप ही प्रक्रिया पार पडली आहे. त्या त्या पक्षांकडून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे तसेच प्रचाराला वेग आला असताना सहकार विभागाने आदेश काढून या निवडणूका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांमधून नाराजी सुद्धा व्यक्त केली जात होती. आता या आदेशाला दोन दिवस उलटत नाही तोच आज राज्य शासनाच्या सहकार विभागाने नव्याने आदेश काढले असून ठरल्या तारखेवर तसेच वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे या आदेशात म्हटले आहे.


शासनाचे सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी हे आदेश काढले आहे. ज्या टप्प्यावर या निवडणुकांना स्थगिती मिळाली होती. त्याच टप्प्यापासून पुढे ठरल्याप्रमाणे निवडणुकीची प्रक्रिया राबवावी असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, दोन दिवसातच निवडणुका पुढे ढकलल्या आणि पुन्हा वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याच्या या आदेशाच्या खो-खोच्या खेळामुळे नागरिकांमध्ये चांगल्याच चर्चा रंगत आहे.


दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे.  या दोन्ही नेत्यांच्या मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. 


ही बातमी देखील वाचा


...तर जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला तयार; एकनाथ खडसेंनी स्पष्टपणे सांगितलं...