Jalgaon Gold News : भारतात तुळशी विवाहानंतर (Tulsi Vivah 2022) सगळीकडे लग्नसराईच्या मुहूर्ताला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, आज सोन्याची सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात (Jalgaon Gold) गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे. 


सोन्याचे दर 55 हजारांच्या पार : 


सुवर्णनगरी जळगावात 10 ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी ग्राहकांना आज तब्बल 55,500 इतका विक्रमी भाव पोहोचल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ आणि त्याचा परिणाम म्हणून जगभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून जळगावच्या सुवर्णनगरीतही त्याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचे दर 52,000 हजारांवर स्थिर होते. आज मात्र 53,800 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला असून वाढत्या किमती पाहता ज्यांना आवश्यकच आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना दिसतायत.


आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 65,440 रुपये आहे.    


दरवाढीमुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलं


लग्नसराईच्या मुहूर्तावर मागील काही दिवसांपासून सोन्याचे दर स्थिर होते. मात्र, जागतिक दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आणि परिणामी नियोजित बजेट बिघडल्याने कमी प्रमाणात सोने खरेदी करीत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहे. काही ग्राहकांनी मात्र तूर्तास सोने खरेदीकडे पाठ फिरवत वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.  


जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. स्पॉट चांदी $0.28 प्रति औंस आणि चांदीचा दर $22.62 प्रति औंस वर मजबूत आहे.


तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Gold Rate Today : सोन्याच्या किंमतीत आज 5 महिन्यांतील सर्वात मोठी एक दिवसीय वाढ; दरवाढीचं कारण नेमकं काय?