Jalgaon News : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आता पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. "बिग बॉसमध्ये (Bigg Boss) बोलावलं नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल," असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. जळगावात (Jalgaon) एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. 

संधी मिळाली तर बिग बॉसमध्ये नक्की जाऊ : गुलाबराव पाटीलआम्हाला बोलावलं तर निश्चितपणे जाऊ. मला असं वाटतं की गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये कोणी बोलवत असेल आणि अशी संधी जर मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण मला होतेय, असे सांगत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्ये म्हणा ही भाग घ्यायचो. असे सांगत आणि आता बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मराठी बिग बॉस होस्ट करणारे महेश मांजरेकर यांना नुकताच प्रश्न विचारण्यात आला होना की, राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉसमध्ये तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर महेश मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं होतं.

बिग बॉस टीव्ही विश्वातील वादग्रस्त रिअॅलिटी शोबिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. कलाकार किंवा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा वादग्रस्त व्यक्तिमत्त्व हे बिग बॉस या शोमधील स्पर्धक असतात. हे स्पर्धक जवळपास तीन महिने एकाच घरात एकत्र राहतात आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नसतो. त्यांच्यावर एका गूढ व्यक्तीची नजर असते त्याला 'बिग बॉस' म्हणून ओळखलं जात आणि त्याची उपस्थिती केवळ त्याच्या आवाजातून जाणवते. भारतात बिग बॉस विविध भाषांमध्ये प्रसारित होतो. उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून हिंदी बिग बॉसला सुरुवात होत आहे. तर मराठी बिग बॉस 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

VIDEO : Gulabrao Patil On Big Boss : बिगबॉसमध्ये जाणं ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल : गुलाबराव पाटील

संबंधित बातम्या