Sanjay sawant on Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) हे  नोटीसीच्या भीतीनेच शिंदे गटात सामील झाल्याचे वक्तव्य जळगावचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केलं. तसेच शिंदे गटात जे जे आमदार गेले ते ईडीच्या (ED) भीतीनेच गेले असल्याचे सावंत म्हणाले. जळगावच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात संजय सावंत बोलत होते. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील सडकून टीका केली. 


शिंदे गटात जे आमदार गेले ते ईडीच्या भीतीने गेले आहेत. जी मालमत्ता जमवली त्याचा हिशोब द्यावा लागत नाही, त्यामुळेच हे चाळीस आमदार गेल्याचे संजय सावंत म्हणाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनाही नोटीस देण्यात आली होती. त्या भीतीनेच ते शिंदे गटात गेले आहेत. गुलाबराव पाटील यांनी समोर येऊन जाहीरपणे सांगावं त्यावेळी मी सांगेल की ती कसली नोटीस होती असे देखील संजय सावंत म्हणाले. यावेळी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून आणावे लागते. त्यांना काय बोलायचं. काय उत्तर द्यायचे याचे सल्लेही दुसरेच देतात असेही सावंत म्हणाले.


एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त चाळीस मतदारसंघाचे


दसरा मेळावा परवानगीवरुनही संजय सावंत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. शिवतीर्थ मैदान हे आमच्यासाठी स्वर्ग आहे. मात्र, यांना स्वर्गात जागा अपुरी पडते, असे म्हणत यांना नरकात राहायची सवय असल्याचे सावंत म्हणाले. त्यामुळं नरकाप्रमाणे  मोठी जागा पाहिजे होती.  सभेसाठी जी जागा यांना मिळाली ती नरकाप्रमानेच मोठी जागा मिळाली असल्याचा टोलाही सावंत यांनी शिंदे गटाला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त त्यांच्यासोबत आलेल्या चाळीस आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतात. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की फक्त चाळीस मतदारसंघाचे असे म्हणत सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 


जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे झालेल्या सभांवरही संजय सावंत यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या सभेला जी गर्दी होते ती जिल्ह्यातील पाच गद्दार आमदारांच्या मतदारसंघातील गर्दी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपची अदृश्य शक्ती आहे. त्यांची ही गर्दी होती असे टीकास्त्र संजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेवर केली.


महत्त्वाच्या बातम्या:


कोण आहेत आदित्य ठाकरे, गोधडीत पण नव्हता..तेव्हा ही मी शिवसेनेत होतो: गुलाबराव पाटील