जळगाव : जळगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत किरणकुमार बकाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळात अनेक खुनांसह कठीण गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. शिवाय गुन्ह्याची उकल करण्याचं प्रमाणही अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसून आले होते. मात्र निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. 


लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेत किरणकुमार बकाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळात अनेक खुनांसह कठीण गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. शिवाय गुन्हे डिटेक्शनचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढल्याचे दिसून आले होते. मात्र असे असताना अचानक निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने विविध चर्चा ही रंगू लागल्या आहेत. मंगळवारी रात्री 11.30 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. एका समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची तक्रार लोकप्रतिनिधींना मंगेश चव्हाण यांनी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर तातडीने पोलिस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली केली असून अधिकाऱ्यावर चौकशी अंती त्यांच्यवर शिस्त भांगाची कारवाई करण्यात येईल असे पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी म्हटले आहे


या घटनेच्या संदर्भात भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस म्हटल आहे की, एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने अशा प्रकारे जातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे हे सहन करण्यासारखे नाही. ज्यांच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय गंभीर आहे. या पोलिस निरीक्षकावर पोलिसांनी तीन दिवसात निलंबनाची कारवाई केली नाही तर आम्ही दहा हजार लोकांचा मोर्चा पोलिस अधीक्षक कार्यालयात नेल्याशिवाय राहणार नाही. या वेळी काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीसच जबाबदार राहतील असा इशारा ही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे