जळगाव : सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना आश्वासन दिलेलं आहे, यावर अजिबात विश्वास नाही. जोवर आरक्षण पूर्णपणे दिलं जात नाही, तोपर्यंत आम्हाला सरकारवर तरी विश्वास नाही. त्यामुळे जर दोन महिन्यानंतर सरकारने आश्वासन पूर्ण केलं नाही तर मुंबईतील अरबी समुदार्त पूर्णपणे जलसमाधी घेऊ, असा इशारा जळगाव येथील मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. 


मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण स्थगित केले आहे. मात्र, मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जळगावमधील (Jalgaon) मराठा कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन करत आरक्षण मिळेपर्यंत आपला आंदोलनाचा पवित्रा कायम राहणार असल्याचं म्हटल आहे. मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी चाळीस ते पन्नास मराठा कार्यकर्त्यांनी आज शहरातील मेहरून तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले आहे. मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) प्रश्नांवर सरकारने केलेल्या मध्यस्थीनंतर मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले असले तरी सरकारच्या धोरणावर आमचा विश्वास नाही, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलने सुरूच राहणार आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत जर सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढील काळात अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यावेळी मराठा आंदोलकांनी दिला आहे. 


मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्यभरामध्ये वातावरण तापल्याच आपल्याला पाहायला मिळाले नव्हतं, म्हणून जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण करून सरकारला अक्षरशः सळो पळो करून सोडलेलं होतं. त्यानंतर मात्र काल एक तोडगा निघालेला आहे. सरकारने काही दिवसांची मुदत मागून घेतली असून मनोज जरांगे यांनी देखील उपोषण मागे घेतले आहे. त्यानंतर राज्यभरात वातावरण शांत झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मनोज जरांगेवर उपचार देखील सुरू आहेत. सध्या उपोषणाला स्थगिती मिळाली असली तरी जळगावमध्ये मात्र मराठा कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं आहे. जळगाव शहरातल्या मेहरून तलाव परिसरामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी तलावामध्ये उतरवून घेतलेला असून मराठा आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी कायम ठेवलेली आहे. 


अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन 


सरकारने आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं नाही. केवळ सरकार वेळ काढूपणाने काम करत आहे. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आंदोलनाला स्थगिती जरी असली तरी आंदोलन थांबलेला नाही. इथून पुढे सुद्धा सरकारने जर आम्हाला निर्धाव, निर्धोक आणि निर्वाण आरक्षण दिलं नाही तर आमचं हे आंदोलन अशाच प्रकारे सनदशीर मार्गाने सुरू राहील असा इशारा आंदोलन कर्त्यांकडून देण्यात आला आहे. सरकारने जे काल मनोज जरांगे यांना आश्वासन दिलेलं आहे, यावर अजिबात विश्वास नाही. हे केवळ मराठा समाजाच्या भावनांशी खेळ केला जात आहे. जोवर आरक्षण पूर्णपणे दिलं जात नाही, तोपर्यंत आम्हाला सरकारवर तरी विश्वास नाही. त्यामुळे जर दोन महिन्यानंतर सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आरक्षणाची भूमिका ठामपणे जर मांडली नाही तर पूर्णपणे जलसमाधी घेऊ, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Maratha Reservation : गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात तारीख आणि मागण्यांचा विसंवाद? आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता