जळगाव : महाराष्ट्रमध्ये दोन-तीन आमदार आणि दोन-तीन खासदारांनी राजीनामे (Resign) दिल्याची माहिती समोर आली आहे. माझ्या राजीनाम्याने जर महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार असेल तर मी अर्ध्या रात्री राजीनामा द्यायला तयार आहे. पण पदाचा राजीनामा देऊन आपण लढू शकत नाही, न्याय द्यायचं असेल तर पदावर राहून आपण न्याय देऊ शकतो, असा विश्वास जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी व्यक्त केला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मागणीसाठी राजीनामा सत्र सुरु असून राज्यातील आमदार खासदारांनी राजीनामा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर मी आज पदाचा राजीनामा दिला तर आमदार म्हणून मला सभागृहात जाऊन प्रश्न मांडता येणार नाही. म्हणून मी आमदार राहूनच या मराठा बांधवांना (Maratha Aarakshan) माझ्या पदाचा उपयोग करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, जर माझ्या राजीनाम्याने जर महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार असेल तर मी अर्ध्या रात्री राजीनामा द्यायला तयार आहे. पण पदाचा राजीनामा देऊन आपण लढू शकत नाही, अशी प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी दिली आहे. 


तसेच मराठा आरक्षणाच्या (Reservation) मागणीवर तातडीने निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत आमदार किशोर पाटील म्हणाले की, निश्चितपणे मी देखील मनोज जरांगे पाटलांच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला पाठिंबा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदयांकडे विशेष अधिवेशनाची मागणी केली असावी. पण जर ती केली नसेल तर मी आमदार म्हणून निश्चितपणे मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी करणार आहे. अधिवेशनात चर्चा करून सर्वानुमते ठराव करून ह्या प्रश्नाला तातडीने मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल, असे सांगत पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. 


झिरवाळ यांची राजीनाम्याची तयारी 


आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. कुणबी समाजाचं नाही तर इतर समाजासाठी झगडणारा नेता म्हणून पुढे आले आहेत. जे काही स्वतःचा त्याग करायचं जे सुरू आहे, ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर प्रक्रिया करून उपोषण कसं मागे होईल, यासाठी प्रयत्न करावा. मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही म्हणाल तिथं मी हजर राहील, मतदान तुम्ही केलं आहे, वेळ पडली तर राजीनामा सुद्धा देण्याची तयारी असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.