जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. तसेच महापालिकेच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचाही पुतळा साकारण्यात आला आहे. महापालिकेत सध्या ठाकरे गटाची सत्ता आहे, त्यामुळे या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धवी ठाकरे यांच्या हस्ते आज होत आहे. अनावरणाच्या सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे. 

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे जळगाव शहरात दाखल झाले असून आज विविध कार्यक्रमासंह जाहीर सभा होत आहे. मनपाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मात्र या पुतळा अनावरणावरुन चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. हा अनावरण सोहळा प्रोटोकॉलनुसार म्हणजेच राजशिष्टाचारनुसार घेण्यात यावा. मुख्यमंत्र्याच्या उपस्थित घेण्यात यावा, अशी मागणी भाजपा शिंदे गटाच्या आमदारांनी मनपा आयुक्ताकडे केली होती. मात्र आता वादात भाजपाने एक पाऊल मागे घेतल्याचे समजते आहे, त्यामुळे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनावरण कोणाच्या हस्ते करायचं असा वाद सुरु होता. यात भाजपच्या वतीने हा अनावरण सोहळा प्रोटोकॉलनुसार म्हणजेच राजशिष्टाचारनुसार घेण्यात यावा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होवो, अशी मागणी भाजपा (BJP) शिंदे गटाच्या आमदारांनी मनपा आयुक्ताकडे केली होती. या मागणीनुसार मनपा आयुक्तांनी शासन मार्गदर्शन मागवले होते. त्याला नगरविकास खात्याचे सचिव शंकर जाधव यांनी लेखी स्वरुपात उत्तर देताना हा अनावरण समारंभ शासकीय राजशिष्टाचारप्रमाणे करण्यात यावा, अस मनपा आयुक्तांना पत्राद्वारे सूचित केले होते. मात्र आता भाजपाने एक पाऊल मागे घेतल्याचे समजते, या कार्यक्रमाला आमचा विरोध नसल्याचे पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

Continues below advertisement

तसेच पुतळा अनावरण समारंभावरुन वाद निर्माण होऊ नये, यासाठी काल दोन्ही गटाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात पार पडली. या विषयावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळा अनावरण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम पूर्व नियोजित असून यासाठी लागणाऱ्या सर्वच परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत. ऐनवेळी राज शिष्टाचार मुद्दा पुढे करणे, यासाठी पत्रव्यवहार करणे, या पाठीमागे राजकीय वास असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यक्रमात त्यांनी सगळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील संजय सावंत यांनी केले आहे. 

महापौरांनी सर्वांना विश्वासात घ्यायला हवे : आमदार भोळे

अखंड भारताला जोडणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान असून राष्ट्रपुरुष आहेत. सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरणासंदर्भात महापौरांनी मोठे मन ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन तसेच समाजातील संत-महात्मे, प्रतिष्ठित लोक आणि संपूर्ण समाजाला विश्वासात घेऊन वेळ घ्यायला हवा होता. महापौरांनी संकुचित मन ठेवले. लोहपुरुषांच्या विचारसरणीला आचरणात न आणता राजकीय पोळी शेकण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे. तरी याबाबतीत जनतेला सगळी माहिती असून जनताजनार्दन आणि समाजबांधव वेळेवर त्यांना समर्पक उत्तर नक्कीच देतील. अनावरणाच्या कार्यक्रमास आमचा कुठलाही विरोध नाही, असे आमदार सुरेश भोळे म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी : 

Jalgaon : उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर, जळगावचे सर्वच आमदार शिंदे गटात, मात्र रणरागिणी ठाकरेंच्या बाजूने!