जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार असून याबाबत शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील म्हटले आहे की, परिवार वादाची चर्चा नाही तर ही पदाची चर्चा आहे. कुठेही पद खडसे यांच्या घराण्याच्या घरात गेले पाहिजे, हे जर तरच्या गोष्टी आहेत. खडसे कुटुंब काही करू शकत, ते खडसे साहेब आहेत. राष्ट्रपती पदाची (President Election) निवडणूक ही लढू शकतात, अशी उपरोधिक टीका शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे  यांच्यावर केली आहे. 


जळगाव  (Jalgaon) जिल्हा सध्या राजकीय कुरुक्षेत्र बनत चालला असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरु आहेत. शिवसेना, ठाकरे गट, भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी  यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. त्यात एकनाथ खडसे (Eknath Khadse) अधिकच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. अशातच शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शक्तिप्रदर्शनासह एकनाथ खडसेंवर जोरदार बाण सोडले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मुक्ताईनगर येथे भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खडसे कुटुंबीय काही पण करू शकत, त्यांचा कुटुंबात त्यांनी ग्रामपंचायत आमदार की खासदारकी दूध संघ निवडणूक लढवली असून ते खडसे साहेब आहेत, आता त्यांनी पीक संवर्धन निवडणूक लढवावी, ते राष्ट्रपती पदाची निवडणूक ही लढू शकतात. ते खडसे साहेब आहेत, असा चिमटा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना काढला आहे. 


चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी महायुतीने रक्षा खडसे (Raksha Khadse) काय किंवा अन्य कुठलाही उमेदवार दिला तर मी त्यांच्या बाजूने उभा राहील, अशा प्रकारचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावेळी रक्षा खडसे यांच्या हालचाली पहिल्या तर लवकरच पक्षांतर करतील असा दावा ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. आगामी काळात नरेंद्र मोदी यांच्यात नेतृत्वाला पसंती राहणार असून अनेकवेळा मोदींच्या विरोधात आघाड्या तयार केल्या गेल्या, मात्र त्यांचा नेता ठरू शकत नाही. ते काय देशाचे नेतृत्व करू शकतील. भविष्यामध्ये केंद्रात भाजपा शिवसेना महायुतीचे सरकार येईल असा विश्वास आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे


 


रक्षा खडसे यांच्याविरोधात उभं राहणार 


सध्यातरी रक्षा खडसे पक्षांतर करतील असे चित्र दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी महायुतीवर एवढ्या वेळा टीका केली. मात्र रक्षा खडसे यांनी त्या टीकेला आतापर्यंत उत्तर दिले नाही. खडसेंनी जळगाव जिल्ह्यातले कामे थांबवली, मात्र रक्षा खडसे यांचा निषेध केला नाही. येणाऱ्या काळात दूध का दूध पाणी का पाणी होईलच. एकनाथ खडसे जेव्हा सरकारवर टीका करतात, त्यावेळेस रक्षा खडसे यांनीही त्यांना उत्तर देणे गरजेचे आहेत. महायुतीतला प्रत्येकाला वाटते की रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या टीकेला उत्तर देणे गरजेचे आहे, मात्र ते तसं करत नाही. महायुतीने कुठलाही उमेदवार दिला तरी मी रक्षा खडसे यांच्या बाजूने उभा राहील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


एकनाथ खडसे रावेरमधून लोकसभा लढवणार? रावेर मतदारसंघात होऊ शकतो सूनबाई विरुद्ध सासरे असा लढा