नाशिक : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना अनेक जण म्हणत आहेत की आता त्यांनी राजकारणातून (Politics) निवृत्ती घेतली पाहिजे. मात्र काही लोकांच वय 85 तसेच 90 वर्ष झालं तरी पंतप्रधान व्हावेसे वाटत असल्याची गंभीर टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. तत्पूर्वी 'शासनात जे निवृत्तीचं वय असते, तेच राजकरणात असायला हवं, माझी तर राजकारणातील हौस भागली असून शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक पदे भूषवली आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असा सल्ला उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी दिला आहे. 


आज गिरीश महाजन जळगावमध्ये (Jalgaon) होते. त्यावेळी ते बोलत होते. गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील काही लोकांना वय झाल्याचं सांगत निवृत्ती घ्यायला सांगितली जात आहे. अगदी खरं आहे, एक वय झाल्यावर माणसाने राजकारणातून निवृत्ती घेणे गरजेचे असते. मात्र काही लोकांना वय झालं तरीही देशाचे पंतप्रधान (PM) व्हावेसे वाटतं आहे. अशी टीका महाजन यांनी केली आहे. आरक्षणावर बोलताना महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी सरकार सकारात्मक असून जरांगे पाटील यांचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रश्नाला तिढा असतो. त्यांच्याही आरक्षणाचा प्रश्नाचा तिढा सुटेल अशी ग्वाही महाजन यांनी दिली आहे. 


तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना महाजन म्हणाले की, काही लोकांच्या डोक्याचा इलाज करावा लागणार आहे. त्यांना पुन्हा हॉस्पिटलला पाठवून त्यांच्यावर इलाज करावा लागेल, असे सांगत एकनाथ खडसेंवरही अशीच टीका केली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पण डोक्याचा इलाज करावा लागेल. एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. खडसे चारही बाजूंनी घेरले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरा काही सुचणार नाही, जमीन घोटाळे, दूध संघ घोटाळे आता नवीन एका जमीन उत्खनन करताना त्यांनी रॉयल्टी वाचविल्याचा नवीन घोटाळा समोर येत आहे. त्यामुळे ते वाटेल ते बडबडत असतात. डोक्यावर पडलेल्या माणसाचा असं वक्तव्य असू शकते. आता ते पंधरा दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मात्र त्यांना पुन्हा दाखल करून उपचार करायला हवा, शिवाय शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार करू, अशी खोचक टीका खडसेंवर केली आहे. 


राजकारणातही निवृत्तीचं वय हवं


निवृत्तीबाबत उदयनराजे म्हणाले की, 'शासनात जे निवृत्तीचं वय असते, तेच राजकरणात असायला हवं, माझी तर राजकारणातील हौस भागली असून याबाबतच शरद पवार यांना देखील सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक पदे भूषवली आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं असा सल्ला उदयनराजे यांनी दिला आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Udayanraje Bhosale on Election : माझी निवडणुकीची हौस भागली, राजकारणातही निवृत्तीचं वय हवं